Latest

Kolhapur News: तारकर्ली समुद्रात बुडालेल्या बस्तवडेच्या तरुणाचा मृतदेह सापडला

अविनाश सुतार

हमिदवाडा : पुढारी वृत्तसेवा : बस्तवडे (ता.कागल) येथील आदित्य पांडुरंग पाटील (वय 23) या तरुणाचा मृतदेह आज (दि.११)   दुपारी साडेतीन वाजता सापडला. सहलीवर गेले असता  आदित्य शुक्रवारी दुपारी चार वाजता मालवण- तारकर्ली समुद्रात बुडाला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. Kolhapur News

याबाबतची अधिक माहिती अशी की, मुरगुड येथील एका खासगी संगणक प्रशिक्षण इन्स्टिट्यूटची 20 मुलामुलींची सहल कुणकेश्वर, देवगड, मालवण येथे गेली होती. दरम्यान तारकर्ली येथील पर्यटन महामंडळाच्या केंद्राजवळ आंघोळीसाठी समुद्रात उतरलेले चार विद्यार्थी अचानक आलेल्या लाटेने बुडू लागले. तेव्हा त्यांनी आरडा ओरडा केला. त्यावेळी स्थानिकांनी धाव घेऊन यातील तिघांना वाचवले मात्र आदित्यला वाचवता आले नाही. Kolhapur News

यातील अजिंक्य पाटील, प्रसाद चौगुले व रितेश वायदंडे यांची प्रकृती व्यवस्थित असून आदित्यचा शोध मात्र सुरू होता. लाटेसोबत तो पाण्यात ओढला गेला होता. शुक्रवारी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम बंद करण्यात आली होती. शनिवारी सकाळी पुन्हा ही मोहीम सुरू केली होती. दरम्यान, आदित्यचे नातेवाईक देखील तेथे दाखल झाले होते. दुपारी साडेतीन वाजता ओहोटीनंतर त्याचा मृतदेह  किनाऱ्यावर  आढळला. सध्या शवविच्छेदन सुरू असून रात्री 11 पर्यंत त्याच्यावर बस्तवडे गावी अंत्यसंस्कार होतील, अशी शक्यता आहे.

दरम्यान, या दु्र्दैवी घटनेने ऐन दिवाळीत  बस्तवडे गावावर  शोककळा पसरली आहे. आदित्य हा एक चांगला खेळाडू व व्यायामावर विशेष प्रेम करणारा मनमिळावू तरुण होता. आई- वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई- वडील, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT