Latest

‘पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये खरेदीचा धूमधडाका

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पावसाळा संपता संपता येणार्‍या गणेशोत्सवातच सर्वजण उत्सवी वातावरणात प्रवेश करतात. त्या पाठोपाठ येणार्‍या दसरा आणि दिवाळीत तर लोकांच्या उत्साहाला उधाण येते. दसरा, दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच. घरात नवीन कपडे, घर सजावटीच्या वस्तू, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी आवर्जून लोक दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त निवडतात. म्हणूनच ग्राहकांना एकाच ठिकाणी भरपूर पर्याय आणि मनासारख्या खरेदीची संधी 'पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2023' उपलब्ध करून देणार आहे.

दसरा आणि दिवाळी सणांच्या खरेदीची संधी एकाच छताखाली देणारा 'पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल' 13 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मनसोक्त शॉपिंगची पर्वणी उपलब्ध करून देणारा 'पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल' दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरात होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट, होम डेकोर, ज्वेलरी, मसाले, बेकरी उत्पादने, आयुर्वेदिक प्रॉडक्ट यांच्याबरोबर अनेक कंपन्यांची चारचाकी वाहने ही या फेस्टिव्हलमध्ये असणार आहे.

राजारामपुरी येथील कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला असणार आहे.

गृहोपयोगी वस्तूंसाठी भव्य दालन, ऑटोमोबाईलचा स्वतंत्र विभाग, फर्निचर, आटाचक्की, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, टी.व्ही., फ्रीज, अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, चहा व मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, शूज, ज्वेलरी, बेकरी उत्पादने, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी ड्रेस, सजावटीच्या वस्तू, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे शंभरांहून अधिक स्टॉल प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतील. या प्रदर्शनामध्ये अनेक नामांकित कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी तसेच इलेक्ट्रिक गाड्यांचा स्वतंत्र विभाग असणार आहे. त्यामुळे गाडी खरेदी करू इच्छिणार्‍यांना आता प्रत्येक कंपनीच्या शोरूमला भेट देण्याची गरज भासणार नाही. एकाच छताखाली अनेक नवनवीन गाड्यांचे मॉडेल्स पाहून त्याची माहिती घेऊन प्रदर्शनातच गाडी बुक करता येऊ शकणार आहे.

खरेदीसाठी उत्सुक असलेल्यांसाठी हा फेस्टिव्हल भरपूर व्हरायटी, अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने आणि अनेक उत्पादनांवर आकर्षक डिस्काऊंट घेऊन येतो. यामुळे हा फेस्टिव्हल ग्राहकांसाठी अवर्णनीय आनंद घेऊन आला आहे. प्रदर्शनाच्या अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी संपर्क सनी 9922930180, प्रणव 9404077990, रोहित 9834433274 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT