Latest

महाडिक, तुम्ही नव्हे जनतेने आमदार केलंय : सतेज पाटील

दिनेश चोरगे

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा :  आपल्याला तुमच्या एका मताने नव्हे, तर करवीरच्या जनतेने आमदार केलंय, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्या आरोपावर केला. आपण आणि आ. पी. एन. पाटील नसतो तर महाडिक, तुम्ही कुठे असता, असा खडा सवाल करत उपकार विसरणे ही महाडिकांची संस्कृती असल्याची टीका त्यांनी केली.

राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीअंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीची प्रचार सभा शनिवारी वडणगे (ता. करवीर) येथे झाली. या सभेत आ. पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या आरोपांना आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिले. सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक शिवाजी पाटील होते.

ग्रामीण भागाचे अर्थकारण ऊस आणि दुधावर आहे. राजाराम हा सर्वात जुना कारखाना आहे. तो सहकारीच व सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, यासाठीच आमचा लढा सुरू आहे, असे सांगत आ. पाटील म्हणाले, राजाराम कारखान्याच्या जीवावरच बेडकिहाळ येथील कारखाना तुम्ही उभारला. त्याचे गरजेनुसार विस्तारीकरण केले, त्याची गाळप क्षमता वाढवली. सहवीज निर्मिती केली. मग, हे सर्व गेल्या दहा वर्षांपासून राजाराम कारखान्यात करण्यास तुम्हाला कोणी रोखले होते, असा सवाल महाडिक यांना केला.

मी 'राजाराम'बाबत प्रश्न विचारतो, त्याच प्रश्नांची उत्तरे द्या, ज्यावेळी डी. वाय. पाटील कारखान्याची निवडणूक लागेल, त्यावेळी त्याबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ असे सांगत आ. पाटील म्हणाले, ही लढाई सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक अशी नसून, कोल्हापूरचे बारा हजार सभासद विरुद्ध येलूरचे सहाशे सभासद अशी आहे. 28 वर्षे त्यांच्या ताब्यात कारखाना होता. येणारी पाच वर्षे कारखाना आमच्या ताब्यात द्या, उसाला चांगला दर, मयत सभासदांच्या वारसांच्या नावे शेअर्स ट्रान्स्फर, नवीन ऊस उत्पादक सभासद, पाणदींचे रस्ते आदी सुविधा देऊ. सहकाराचे हे मंदिर सभासदांच्याच मालकीचे कायम ठेवायचे असेल, तर परिवर्तन केलेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

भीमा कारखान्यावर 578 कोटी कर्ज आहे, 88 हजार साखर पोती कारवाईपोटी जप्त केली, त्यांनी आम्हाला साखर कारखानदारीचे ज्ञान देऊ नये, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांना लगावत आ. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोणत्या कारखान्यात चेअरमन दोन कोटी रुपये खर्च करतो, ते जाहीर करा. खोटे बोल पण रेटून बोल, ही तुमची संस्कृती आहे अशीही टीका त्यांनी केली.

तज्ज्ञ संचालक म्हणून महाडिक यांना राजाराम कारखान्यात घेतले आणि घात झाला. येलूरमधून उंट आला आणि तंबू घेऊन गेला. महाडिक यांनी कारखान्याचे स्मशान केले आहे, अशी टीका माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केली. यावेळी बी. एच. पाटील, बाजीराव पाटील, सचिन चौगले, बी. आर. पाटील, उदयानी साळुंखे यांची भाषणे झाली. यावेळी पांडुरंग पाटील (शिये), हरीष चौगले, मोहन सालपे, विठ्ठल माने यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

येलूरचे पार्सल ही इस्ट इंडिया कंपनी

शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. आपण गृह राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या कार्यक्रमाला कुठे गालबोट लागू नये, मी याच मातीतला आहे, मला त्याची काळजी आहे. यामुळेच मी बिंदू चौकात गेलो नाही. येलूरचे पार्सल म्हणजे इस्ट इंडिया कंपनी आहे. त्यांना या मातीशी काही देणे घेणे नाही. त्यांची मग्रुरीची भाषा चालणार नाही, असा इशाराही आ. पाटील यांनी दिला.

मी कारखाना बोलतोय…

सभेच्या ठिकाणी 'मी कारखाना बोलतोय' ही कारखान्याची सद्यस्थिती दाखवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. याद्वारे कारखान्यातील वाहून जाणारा रस, भिजलेली साखरेची पोती, छतावरील उडालेले पत्रे, पडलेल्या भिंती अशी दुरवस्था दाखवण्यात आली. ही सर्व माहिती संबंधितांनी दिल्याचे आ. पाटील म्हणाले.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT