Latest

Kolhapur Maratha Reservation : कागल, शिरोळ तालुक्यात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण, आंदोलने, रास्ता रोको, कँडल मार्च काढून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. (Kolhapur Maratha Reservation)

मळगे बुद्रुकीत दाम्पत्याचे आमरण उपोषण

कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक गावच्या सरपंच दाम्पत्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कागल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सरपंच नलिनी कृष्णात सोनोळे व कृष्णात सदाशिव सोनोळे असे त्यांचे नाव आहे. त्यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून कागल तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी सोनोळे दाम्पत्यांनी उपोषण सुरू केले आहे. गावातील नागरिकांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. सलग दोन-तीन दिवस रात्रंदिवस आमरण उपोषण सुरू केल्यामुळे सोनाळे दाम्पत्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रात्री उशिरा कागल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सरपंच नलिनी कृष्णा सोनोळे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचे पती कृष्णात सदाशिव सोनोळे यांनी उपचार घेतल्यानंतर पुन्हा उपोषण ठिकाणी जाऊन आपले उपोषण कायम सुरू ठेवले आहे. त्यांच्या या उपोषणाला संपूर्ण जिल्ह्यातील विविध संघटना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून पाठिंबा व्यक्त केला आहे तसेच त्यांची ग्रामीण रुग्णालयात जाऊन अनेकांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आहे.

मुदाळतिट्टा येथे मराठा आरक्षण प्रश्नी युवकाचे उपोषण

मुदाळतिट्टा येथे यामध्येच बोरवडे (दि. कागल) येथील 24वर्षीय युवक ओंकार सागर चव्हाण याने आमरण पोषण सुरु केले आहे. ओंकार चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्याची तब्येत खालावली आहे.

आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय भवानी जय शिवाजी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमचा लढा मराठा आरक्षणासाठी, मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शनासाठी आशा घोषणा देत या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. राधानगरी भुदरगड कागल करवीर तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या मुदाळतिट्टा या ठिकाणावर हे उपोषण सुरू असल्यामुळे ये जा करणारा प्रवासी वर्ग या साखळी उपोषणात सहभागी होताना दिसत आहे. मुदाळतिट्टा व्यापारी असोसिएशन,बोरवडे, मुदाळ ग्रामपंचायत,अन्य संघटना,अन्य समाजातील बांधव पोषणाला पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भुदरगड तालुक्यातील कार्यक्रर्ते ही सहभागी झाले आहेत.

शिरोळ तालुक्यात आरक्षणासाठी ठिकठिकाणी रस्ता रोको

कवठेगुलंद येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलास जि. परिषद मतदारसंघातील नृसिंहवाडी, आलास, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, औरवाड, गौरवाड, बुबनाळ मधील सकल मराठा समाजाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. कवठेगुलंद इथून निघालेली मोटारसायकल रॅलीचे नृसिंहवाडी इथे आल्यावर रास्ता रोको आंदोलनामध्ये रूपांतर झाले. नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा ठोकले मोर्चाचे राज्य समन्वय सागर धनवडे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष युवराज जगदाळे, पृथ्वीराज यादव यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी संपूर्ण तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

सुनील संकपाळ, अनंत धनवडे, संतोष धनवडे, श्रीनिवास गावडे, आनंदा कुंभे, सागर धनवडे, ऋषिकेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करीत मराठा समाजाला आरक्षणाबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी सुनील संकपाळ यांनी रक्ताने लिहलेले निवेदन मंडल अधिकारी अमित पडळकर यांना देण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंब्याचे पत्र दिले. या आंदोलनात आठ गावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT