Latest

1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचे टोकनाइजेशन होणार; या सोप्या पद्धतीने करा कार्डचे टोकनाइजेशन

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: कार्ड टोकनायझेशनशी संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम लागू होण्यासाठी आता फक्त दोन ते तीन दिवस उरले आहेत. 1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करताना तुम्हाला ई-कॉमर्स किंवा मर्चंट वेबसाइट, पॉइंट ऑफ सेल पेमेंट गेटवेवर तुमच्या कार्ड तपशीलांऐवजी टोकन नंबर द्यावा लागेल. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की, आता तुमच्या कार्डचे तपशील कोणत्याही ठिकाणी सेव्ह करता येणार नाहीत, मग ती मर्चंट वेबसाइट असली तरीही. या नियमांतर्गत तुमचे कार्ड टोकनमध्ये रूपांतरित करणे आणि तुमच्या टोकनशी संबंधित तपशील सुरक्षित ठेवणे, ही तुमची जबाबदारी असेल.

आरबीआयचा नवा नियम काय आहे?

भारतीय रिझर्व्ह बँकेने हे निश्चित केले आहे की, 1 ऑक्टोबरनंतर कोणताही पेमेंट एग्रीगेटर, पेमेंट गेटवे किंवा व्यापारी कोणत्याही ग्राहकाचा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डेटा त्यांच्याकडे जतन किंवा संचयित करू शकणार नाही. याचा अर्थ असा होईल की, 30 सप्टेंबरनंतर कोणतीही वेबसाइट किंवा अॅप 16 अंकी कार्ड क्रमांक आणि कार्डच्या मुदतीची तारीख डेटा म्हणून संग्रहित करू शकणार नाही. कृपया लक्षात घ्या की, सध्या विविध वेबसाइट आणि पेमेंट गेटवे कार्ड पेमेंट करताना फक्त सीव्हीव्ही नंबर आणि ओटीपी मागतात. बाकीचा डेटा ते आधीच त्यांच्याकडे ठेवतात. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार 1 ऑक्टोबरपासून हे शक्य होणार नाही.

कार्ड टोकनायझेशन नंतर हा बदल होणार, अशा प्रकारे कार्ड टोकनायझेशन करणार काम

1 ऑक्टोबरपासून तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास काही बदललेल्या नियमांसह ते करू शकाल. पेमेंटच्यावेळी तुम्ही 16 अंकी कार्ड क्रमांक, नाव आणि सीव्हीव्ही क्रमांक टाकून पुढे जाल, त्यानंतर तुम्हाला Secure your card as per RBI guidelines option वर क्लिक करावे लागेल.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. बँकेच्या पेमेंट पेजवर ओटीपी टाकल्यानंतर तुमचे कार्ड टोकन तयार होईल. तुम्ही हे टोकन तुमच्या व्यापाऱ्यासोबत शेअर करू शकाल. आता व्यापारी साइट फक्त या कार्डचा डेटा सेव्ह करू शकतील. या मागे आरबीआयचा हा उद्देश आहे की, तुमच्या कार्डच्या तपशीलांना संग्रहित करण्याऐवजी सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर देणे.

कार्ड टोकनायझेशनची प्रक्रिया होते सहा सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण

स्टेप-1: कोणत्याही ई-कॉमर्स साइट, मर्चंट वेबसाइट किंवा पॉइंट ऑफ-सेलवर खरेदी केल्यानंतर तुमचे पेमेंट ट्रांजेक्शन सुरू करा.

स्टेप -2: चेक आउट करताना, तुम्ही ज्या कार्डवरून पेमेंट करत आहात, त्या कार्डचे तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे तपशील सबमिट करा. जर कार्डचे तपशील या प्लॅटफॉर्मवर आधीच सेव्ह केले असल्यास, तुम्हाला ज्या कार्डवरून पेमेंट करायचे आहे ते कार्ड निवडा.

स्टेप-3: यानंतर तुम्हाला 'secure your card as per RBI guidelines option' किंवा 'tokenise your card as per RBI guidelines" वर क्लिक करावे लागेल.

स्टेप-4: यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल फोन किंवा ईमेल आयडीवर ओटीपी येईल, तो एंटर केल्यानंतर तुमच्या कार्डचे टोकन जनरेट होईल.

स्टेप- 5: एकदा तुमचे कार्ड टोकन तयार झाल्यानंत, तुम्ही कार्ड तपशीलांऐवजी मर्चंट वेबसाइटवर टोकन तपशील शेअर करून पेमेंट करू शकाल.

स्टेप -6: भविष्यात जेव्हा तुम्हाला त्या वेबसाइट किंवा अॅपवरून पुन्हा पेमेंट करायचे असेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या कार्ड नंबरचे शेवटचे चार अंक दिसतील. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT