Latest

KL Rahul-Athiya Shetty Wedding : राहुल-अथिया शेट्टी ‘या’ दिवशी लग्नबंधनात अडकणार!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul-Athiya Shetty Wedding : खरे प्रेम लपूनही लपत नाही, असे म्हणतात. अशातच लव्ह बर्ड्स अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाचीही चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीय. गेल्या काही दिवसांपासून अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता पुन्हा एकदा दोघांच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आली असून दोघांच्या चाहत्यांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. (KL Rahul and Athiya Shetty Wedding in 2023 says reports)

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीला गेल्या तीन वर्षांपासून डेट करत आहे. आता दोघेही २०२३ च्या सुरुवातीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अथिया आणि केएल राहुल यांनी आपल्या लग्नाचा मुहुर्त हिवाळा ऋतूत ठेवला आहे. हे लव्ह बर्ड्स या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी २०२३ मध्ये विवाह करतील. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, जर अथिया आणि केएल राहुल यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले नाही, तर ते दोघेही पुढच्या वर्षी २०२३ च्या सुरुवातीलाच जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सात फेरे घेऊन एकमेकांशी लग्न करू शकतात. मात्र, या जोडप्याच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे येत्या काळात कळेलच. (KL Rahul and Athiya Shetty Wedding in 2023 says reports)

अथिया-राहुलच्या लग्नाची चर्चा यापूर्वीही झाली…

काही काळापूर्वी अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत होत्या. याआधी अशी चर्चा होती की अथिया आणि केएल राहुल येत्या तीन महिन्यांत लग्नगाठ बांधून त्यांचे नाते नव्याने सुरू करू शकतात. मात्र, अथिया शेट्टी आणि तिचे वडील सुनील शेट्टी यांनी या वृत्तांचे खंडन केले. एक पोस्ट शेअर करताना अथियाने लिहिले – आशा आहे की मला या लग्नासाठी आमंत्रित केले जाईल, जे 3 महिन्यांत होणार आहे. यासोबत तिने हसणारा इमोजीही पोस्ट केला होता. अथियाने जेव्हा तिच्या लग्नाची बातमी फेटाळली तेव्हा तिचे चाहते दु:खी झाले. पण आता नवीन रिपोर्ट्सने चाहते पुन्हा सुखावले आहेत. (KL Rahul and Athiya Shetty Wedding in 2023 says reports)

अथिया आणि केएल राहुलच्या बाँडबद्दल बोलताना दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अथिया आणि राहुल अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी देत असतात. दोघांच्या जोडीला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. अथिया आणि राहुल यांचं लग्न कधी होणार याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT