Latest

KKR vs CSK : कोण लुटणार आयपीएलचे सोने?

Arun Patil

दुबई (वृत्तसंस्था) : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्‍नई सुपर किंग्जसमोर इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR vs CSK) आव्हान असणार आहे. आकड्यांबाबत बोलायचे झाल्यास चेन्‍नई सुपर किंग्जच्या संघाने 12 सत्रांमध्ये नऊ वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे.

तर, दोन सत्र ते लीगच्या बाहेर होते. चेन्‍नईच्या संघाने तीन वेळा जेतेपद मिळवले आहे आणि पाचवेळा त्यांना अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपली दोन्ही जेतीपदे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली जिंकलेली आहेत.

चेन्‍नईच्या संघाला चौथे जेतेपद मिळवायचे झाल्यास कोलकाताचे वरुण चक्रवर्ती, शाकिब-अल-हसन आणि सुनील नारायण यांचा ते कसे सामना करतात यावर बरेच काही अवलंबून असेल. तिघांनीही स्पर्धेत सातहून कमीच्या सरासरीने धावा दिल्या आहेत. आंद्रे रसेलला दुखापत झाल्याने शाकिबला संधी मिळाली आणि संघासाठी त्याने चमक दाखवली. (KKR vs CSK)

चेन्‍नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाडने या सत्रात चमकदार कामगिरी केली आहे. तीन अर्धशतकांच्या मदतीने त्याने 600 हून अधिक धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी चेन्‍नईच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली होती; पण यावेळी संघाने जोरदार पुनरागमन करीत फायनलमध्ये धडक मारली.

चेन्‍नईकडे अनुभवाची कमतरता नाही. ड्वेन ब्राव्हो, फाफ-डू-प्लेसिस, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पासारखे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. या सत्रात धोनीने सुरेश रैनाला मैदानाबाहेर ठेवले. खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या रैनाऐवजी संघाने उथप्पाला संधी दिली आणि दिल्लीच्या विजयात त्याने संघासाठी आपले योगदान दिले.

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे विश्‍वचषक विजेता कर्णधार आहे ज्याने निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाचे रुपडे पालटून टाकले. मॉर्गनच्या नेतृत्वावर टीका होत असली तरीही संघ व्यवस्थापनेने त्याच्यावर विश्‍वास दाखवला. शुभमन गिलने डावाची सुरुवात करत संघांसाठी धावा केल्या.

व्यंकटेश अय्यरसारख्या खेळाडूवरदेखील संघाने विश्‍वास ठेवला आणि त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. सध्याचा कोलकाता संघाचा फॉर्म पाहता चेन्‍नईसाठी जेतेपद मिळवणे सोपे नसेल.

दोन्ही संघांची आजवरची आयपीएलमधील कामगिरी

कोलकाता नाईट रायडर्स

फायनल 2
विजेतीपदे 2
उपविजेतेपद 0

2008 : सहावे स्थान

2009 : आठवे स्थान

2010 : सहावे स्थान

2011 : एलिमिनेटर

2012 : विजेता

2013 : सातवे स्थान

2014 : विजेता

2015 : पाचवे स्थान

2016 : एलिमिनेटर

2017 : क्वालिफायर-2

2018 : क्वालिफायर-2

2019 : पाचवे स्थान

2020 : पाचवे स्थान

चेन्‍नई सुपर किंग्ज

8 फायनल
3 विजेतीपदे
5 उपविजेतीपदे

2008 : उपविजेता

2009 : उपांत्य फेरी

2010 : विजेता

2011 : विजेता

2012 : उपविजेता

2013 : उपविजेता

2014 : प्ले ऑफ

2015 : उपविजेता

2016 : सहभाग नाही

2017 : सहभाग नाही

2018 : विजेता

2019 : उपविजेता

2020 : सातवे स्थान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT