पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 ला सुरुवात झाली असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होता. यादरम्यान शाहरुखचा लाडका आर्यन खान स्टेडियममध्ये त्याची टीम कोलकाता नाइट रायडर्सला प्रोत्साहन देताना दिसला.
सामन्यादरम्यान आर्यनचे काही फोटोही समोर आले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन खानसोबत एक सुंदर मुलगीही दिसली होती, ज्याची सोशल मीडियावर चर्चा जोरात सुरू झाली आहे. लोक या मिस्ट्री गर्लबद्दल प्रश्न विचारतानाही दिसत आहेत.
आर्यन खान टीम केकेआरला सपोर्ट करण्यासाठी एकटाच आला होता.
आर्यन खान हा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आहे, त्यामुळे अनेकांना त्याच्यामध्ये शाहरुखची झलक दिसते. एक वेळ अशी होती की शाहरुख नेहमी मैदानावर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी हजर असायचा, पण कामात व्यग्र असल्याने यावेळी तो सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे आर्यन खान त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसला. आर्यन काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये आपल्या टीमला चिअर करताना दिसला. तो त्याच्या मित्रांसोबत बोलतानाही दिसत होता. आर्यन खान कॅमेऱ्यात कैद झाला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सकडून 6 गडी राखून पराभव झाला. आज आयपीएलचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात होणार आहे.
हे ही वाचलं का ?