Latest

आता उद्धव ठाकरे यांची झोप उडणार : किरीट सोमय्या

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर 'ईडी'ने कारवाई करत ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सांगितले की, "उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोपही उडणार आहे", असा इशारा दिला आहे.

३० कोटींचा गैरव्यवहार झाला

"श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारामुळे त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. ईडीने एका व्यवहाराची माहिती दिली असून, ३० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. गेल्या ईडीला गेल्या दीड वर्षात कोट्यवधींची माहिती दिली आहे. सगळ्या गोष्टीबाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे", असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?

"उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध काय? अशी विचारणा यावेळी किरीट सोमय्यांनी केली. नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? हे माझं वाक्य संपल्याबरोबर उद्धव ठाकरेंची माफिया सेना लगेच बोंबाबोंब सुरु करणार. याआधी मी असाच प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांचा संबंध काय?", असेही खोचक प्रश्न सोमय्या यांनी निर्माण केले.

…यावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?

सोमय्या म्हणाले की, "ठाकरे साहेबांनी त्यांचे आणि परिवाराचे आर्थिक व्यवहार, व्यवसायिक संबंध सांगितले तर किरीट सोमय्या, ईडी किंवा न्यायालयाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. १९ बंगले लपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. पण खरं बाहेर आलंच. २०१९ मध्ये रश्मी ठाकरे यांनी हे बंगले माझे आहेत असे सांगितले हाेते. तर २०२१ मध्ये उद्धव ठाकरे बंगलेच नाही सांगतात. पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यातील आर्थिक संबंध व्यवहारावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?", असा सवालही किरीट सोमय्यांनी केली आहे.

ती कंपनी नंदकिशोर चतुर्वेदींना का दिली?

"मुख्यमंत्री परिवाराला माझी विनंती आहे की, जे आर्थिक व्यवहार आहेत, शेल कंपन्यांकडून पैसे घेतले, मनी लाँड्रिंग केलं. त्यासंबंधी तुम्ही माहिती देणार की मलाच द्यावी लागणार. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी बनवली होती. यामध्ये आदित्य ठाकरे मालक पण, संचालक पण, ५० टक्के त्यांचे आणि ५० टक्के रश्मी ठाकरेंचे. या कंपनीची आता नंदकिशोर चतुर्वैदीच्या मालकीची आहे. हा हवाला ऑपरेटर असून ३० कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे परिवाराने जी कंपनी बनवली होती ती नंदकिशोर चतुर्वेदींना का दिली?", असा सवालही किरीट सोमय्यांनी केली यावेळी केला.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT