neema and kili paul  
Latest

Kili Paul : किली पॉलला मराठी गाण्याची भूरळ, ‘आली उमलून माझ्या गाली’ गाण्यावर डान्स (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील आली उमलून माझ्या गाली…मधुमास हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडला आहे. (Kili Paul ) या ट्रेंडवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिल्स बनवले आहेत. या गाण्याची इतकी भूरळ आहे की, टांझानियातील किली पॉलला देखील या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्याने या गाण्यावर रिल्स केले आहे. या रिल्सला नेटकऱ्यांनी इतकी पसंती दिली आहे की, किली पॉलचे कौतुक होताना दिसतेय. (Kili Paul )

किली पॉलच्या या डान्सवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी म्हटलंय – 'भाऊ तू आमच्या मराठी प्रेक्षकांना खुश केल्या बद्दल तुला, प्रेमाचा जय महाराष्ट्र!? Jay Maharashtra❤️, Mast dance kela neematai ❤️ani killi bhau❤️, Gajab ka talent❤️❤️?❤️❤️, He is the legend he shine the name of his people's ?❤️, Connecting of two countries ❤️, Multitalanted ❤️, I really love this song and I do the challenge to'.

व्हिडिओमध्ये इन्स्टाग्राम स्टार किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉल डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून अनेक मराठी बांधवांनी त्यांना कमेंट्स दिल्या आहेत. या आधी दोघांनी भोजपुरी गाने ' गाल छू के गोड लागे देवरा' (Gal Chhu Ke God Lage Devra) वर जबरदस्त डान्स केला होता. सोशल मीडिया युजर दोघांच्या व्हिडिओजना फॅन्सकडून पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ किलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT