पुढारी ऑनलाईन डेस्क : एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरीमध्ये कियारा आडवाणी (साक्षी धोनी) ची मैत्रीण रिया शर्मा असते. रियाने रितु ही भूमिका या चित्रपटात साकारली होती. (Rhea Sharma) तुम्हाला माहितीये का, रिया शर्मा ही टीव्ही अभिनेत्रीदेखील आहे. रियाने २०१४ मध्ये टीव्ही मालिका इतना करो ना मुझे प्यारमधून करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये रियाने निशि खन्नाची भूमिका साकारली होती. रियाने बडी दूर से आये है, ये आशिकी, लाल इश्क, तू सूरज मैं साँझ पियाजी, ये रिश्ते प्यार के या मालिकेतही काम केलं आहे. (Rhea Sharma)
एमएस धोनी चित्रपटात ती साक्षीची कॉलेज मैत्रीण रितुच्या भूमिकेत दिसली होती. रियाचा जन्म ७ ऑगस्ट, १९९५ रोजी, मुंबईत झाला. तिच्या बहिणीचे नाव स्नेहा आणि छोट्या भावाचे नाव गौरव आहे. रिया एका मारवाडी परिवारातून आलेली आहे. तिने आपले शिक्षण मुंबईतील सेंट झेविअर्स स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने सेंट झेविअर्समधून आपले पदवीचे शिक्षण घेतले.
२०१६ मध्ये रिया शर्माने कहानी हमारी…दिल दोस्ती दीवानेपन की टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तिच्यासोबत करण वाही आणि निखिल चड्डा कलाकार होते. त्याच वर्षी तिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्येही एम. एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून डेब्यू केला.
स्टार प्लसवरील दीया और बातीचा दुसरा भाग सूरज मैं साँझ पियाजीमध्ये कनकच्या भूमिकेत ती दिसली. या मालिकेचे प्रसारण ३ एप्रिल, २०१७ ते १ जून २०१८ पर्यंत झाले होते. २०१९ मध्ये रिया स्टार प्लसवर प्रसारित होणारी मालिका ये रिश्ते हैं प्यार के मध्ये काम केले होते. यामद्ये तिने मिष्टीची भूमिका साकारली होती. रियाने टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी जाहिरातींमध्येही काम केलं होतं.