Latest

Indian Army Dog Kent प्राणाहुती देत ‘केंट’ ने वाचविले दोन जवानांचे जीव: लष्कराच्या ८ ऑपरेशन्समध्ये होता सहभाग

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे. याशिवाय पोलिस एसपीओसह तिघे जखमी झाले आहेत. चकमकीत २१ आर्मी श्वान युनिटमधील भारतीय लष्कराच्या केंट नावाच्या  मादी श्वानाचाही मृत्यू झाला आहे. (Indian Army Dog Kent)

दहशतवादी चकमकीत आपल्या हँडलरचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लष्कराच्या केंटसाठी श्रद्धांजली वाहताना भारतीय लष्कराने केंटच्या स्मरणार्थ एक व्हिडिओ शेअर केला आहे.आज सहा वर्षीय गोल्डन लॅब्राडोर केंट जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शोध मोहिमेदरम्यान सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याच्या हँडलरला क्रॉस फायरपासून वाचवण्यासाठी ट्रॅकर केंटने स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. (Indian Army Dog Kent)

केंटच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी भारतीय सैन्याने कर्तव्यावर असलेल्या शूर केंटचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो शोध ऑपरेशन ड्रिलमध्ये सैनिकांचे नेतृत्व करतो. ट्रॅकर डॉग म्हणून तिला प्रशिक्षित करण्यात आले होते. केंटने ५ वर्षांत ८ ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतला होता.

व्हिडीओमध्ये एक दृढनिश्चय केंट एका दहशतवाद्याचा  शोध घेत असल्याचे दाखवले आहे. सैनिकांचा एक गट तिला दाट झाडी असलेल्या जंगलाजवळ घेऊन जातो. केंट दहशतवाद्यांचा माग काढते आणि अधिकाऱ्यांना त्वरीत उंच झुडपांच्या भागात घेऊन जाते. दहशतवाद्यांनी हवेत हात वर केल्याने केंट भुंकते आणि सैनिकांना सावध करते. केंट त्या दहशतवाद्यांवर झडप घालते, दरम्यान दहशतवाद्यांच्या गोळीबारात केंटला वीरमरण येते.

केंटच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्याच्या "सर्वोच्च बलिदान" आणि बिनशर्त दृढनिश्चयाला सलाम केला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT