Karnatak news 
Latest

Karnataka News : कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांनी प्रजा ध्वनी रॅलीत उधळल्या 500-500 च्या नोटा; पाहा व्हिडिओ

backup backup

पुढारी ऑनलाइन न्यूज : Karnataka News : कर्नाटकचे काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी प्रजा ध्वनी रॅलीत जनतेवर 500-500 च्या नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. श्रीरंगापट्टण येथील काँग्रेसच्या वतीने आयोजित प्रजा ध्वनी यात्रेत शिवकुमार सहभागी झाले होते. या यात्रेतील हा व्हिडिओ आहे. ही यात्रा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांच्या या व्हायरल व्हिडिओमुळे वाद निर्माण केला आहे. तसेच अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहे.

Karnataka News : नोटा उडवतानाचा व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथे काँग्रेसच्या वतीने प्रजा ध्वनी यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या यात्रेत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार सहभागी झाले होते. व्हिडिओत ते बसमध्ये उभे असल्याचे दिसत असून माइकवरून बोलत आहेत. या बसच्या मागे अन्य गाड्यांचा ताफा देखील दिसत आहे.

व्हिडिओत बसच्या पुढे काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसचा झेंडा घेऊन घोषणा देत पुढे चालत असल्याचे दिसत आहे. यावेळी बेविनाहल्ली जवळ बसमध्ये उभे असताना त्यांनी कलाकारांवर 500-500 रुपयांच्या नोटा उधळल्याचे म्हटले आहे. शिवकुमार यांचा नोटा उधळतानाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Karnataka News : भाजपकडूनही व्हिडिओ व्हायरल

कर्नाटक भाजपनेही हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपने लिहिले आहे की, 'ते म्हणतात की त्यांच्या चार पिढ्या काँग्रेसमध्ये आहेत. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला वास्तव समजेल. मात्र, याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Karnataka News : यापूर्वीही शिवकुमार विवादाच्या भोवऱ्यात अडकले होते

कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार हे यापूर्वी देखील विवादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी डीजीपी प्रवीण सूद यांना 'नालायक' म्हणून संबोधले होते. त्यांच्या दाव्यानुसार डीजीपी प्रवीण राज्यातील भाजप सरकारचा बचाव करत असून त्यांच्या पक्षातील नेत्यांविरोधात मात्र केस दाखल करत आहे. आपल्या पक्षाची सत्ता आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवकुमार यांनी दिला होता.

Karnataka News : निवडणूक आयोग करणार आज तारखा जाहीर

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे आज कर्नाटक विधानसभा निवडणुकांची तारखांची आज घोषणा होऊ शकते. 224 विधानसभा जागांसह कर्नाटकात काँग्रेसने यापूर्वीच 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. लवकरच उर्वरित उमेदवारांचीही नावे जाहीर केली जातील, असे डीके शिवकुमार यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT