पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकात लोकायुक्तांनी भ्रष्टाचारप्रकरणी आज (दि.५) धडक कारवाई केली. राज्यात तब्बल ६३ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या छाप्यांमध्ये 6 लाख रुपयांची रोकड, 3 किलो सोने, 25 लाख रुपयांचा हिरा, 5 लाख रुपयांच्या पुरातन वस्तू जप्त केल्या असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे . (Karnataka Lokayukt)