सुषमा अंधारे 
Latest

पप्पू बाप निघाला, केवळ पास नाही मेरिट आलाय :सुषमा अंधारे

नंदू लटके

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  मागील नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवलं. त्याला लोक कंटाळलेले आहेत. भाजपा स्लीपर सेलने राहुल गांधी यांना पप्पू ठरविण्याचे प्रयत्न केले. तो पप्पू सगळ्याच बाप निघाला, पप्पू सिर्फ पास नही हुआ , पप्पू मेरीट मे आया है..अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर व्‍यक्‍त केली.

पूर्व विदर्भ दौऱ्यावर असलेल्या अंधारे माध्यमांशी बोलताना म्‍हणाल्‍या की, कर्नाटकमधील जनता सुजाण आहे. दक्षिण भारतीय प्रगत विचारधारेचे आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालामुळे नवी ऊर्जा महाराष्‍ला मिळेल. काँग्रेसला भारत जोडो यात्रेचा नक्कीच फायदा झाला. राहुल गांधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, त्यांच्यासोबत नेहरू, गांधी त्यांच्या सगळ्या परिवाराची इमेज खराब करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने झाला, असेही त्या म्हणाल्या.

धर्माच्या नावाने मत मागणे, ही भाजपची फार जुनी सवय आहे. जेव्हा भाजप वेगवेगळ्या आघाडीवर अपयशी ठरते , तेव्हा -तेव्हा भाजप महापुरुषांच्या फोटो आड लपते, असा आरोपही त्‍यांनी यावेळी केला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT