पुढारी ऑनलाई डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. कडेकोट बंदोबस्तात आज (दि.१३) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतची मतमोजणी पाहता काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पूत्र यतिंद्र सिद्धरामय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, त्यांचे वडील पूर्ण बहुमत मिळवतील आणि स्वबळावर सत्तेवर येतील. कर्नाटकच्या हितासाठी वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर बातमी. (Karnataka Election Results)
Karnataka Election Results : काँग्रेसला पूर्ण बहूमत मिळेल
उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला कडेकोट बंदोबस्तात आज (दि.१३) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. आतापर्यंतची मतमोजणी पाहता काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पूत्र यतिंद्र सिद्धरामय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकच्या हितासाठी माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते," ते पुढे म्हणाले की, राज्यात काँग्रेसला पूर्ण बहूमत मिळेल आणि वरुणा मतदारसंघात त्यांचे वडील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल आणि कर्नाटकात सरकार स्थापन होईल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही स्वबळावर सरकार बनवू.
माध्यमाशी बोलताना यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले, "एक मुलगा या नात्याने मला नक्कीच त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल. पण राज्याचा रहिवासी म्हणून त्यांच्या मागच्या कारकिर्दीत खूप चांगला कारभार होता. भाजपची सत्ता त्यांच्यामुळेच दुरुस्त होईल. राज्याच्या हितासाठी त्यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.