पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाची कर्नाटकातील विधानसभेची निवडणूक केवळ कर्नाटकाच्या दृष्टीने नसून देशाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीपाठोपाठ राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. आज कर्नाटकमध्ये विधानसभा जागेसाठी मतदान होत आहे. (Karnataka Assembly Elections) या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. वाचा काय म्हणाले ते…
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले,"मी मतदान केले आहे आणि लोकशाहीसाठी माझे कर्तव्य केले आहे. माझ्या मतदारसंघात मतदान करणे हा एक विशेषाधिकार आहे. मी विक्रमी फरकाने जिंकेन. कर्नाटकातील लोक सकारात्मक विकासाला मतदान करतील आणि भाजपला बहुमत मिळेल".
लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सह-संस्थापिका सुधा मूर्ती यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्रावर त्या लवकर पोहोचल्या. रांगेत उभे राहून त्यांनी मतदान केले. त्यानंतर त्यांनी तरुणांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की," मी तरुणांना नेहमी सांगते की, या आणि मतदान करा. तुमच्यात बोलण्याची ताकद आहे, मतदान केल्याशिवाय तुम्हाला बोलण्याची ताकद नाही येत".
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि कनकापुरा येथील पक्षाचे उमेदवार डीके शिवकुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आज तरुण मतदारांना मोठी संधी आहे. ते बदलासाठी मतदान करतील. त्यांना राज्यातील महागाई आणि भ्रष्टाचाराची माहिती आहे. मला खात्री आहे. ते बदल घडवून आणतील आणि आम्ही १४१ जागा निवडून येऊ." यावेळी त्यांनी असाही विश्वास व्यक्त केला की, " काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल."
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते सदानंद गौडा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "लोकांनी बाहेर पडून मतदान केले पाहिजे. माझ्या पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत आणि मला आशा आहे की, ज्या पक्षाची आश्वासने पूर्ण झाली आहेत त्यांना लोक स्वीकारतील,"
"कर्नाटक बजरंग बलीची भूमी आहे. १३ मे रोजी या सर्व गोष्टींना उत्तर देईल. आम्ही डीके शिवकुमार आणि काँग्रेस पक्ष एलपीजी सिलिंडरची प्रार्थना करत आहे. त्याचे स्वागत करतो, आम्हाला आनंद आहे की काँग्रेस किमान एक प्रकारची तरी पूजा करत आहे."
बेंगळुरूमध्ये मतदान केल्यानंतर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती माध्यमांशी बोलताना म्हणाले, तरुणांनी मतदान करणे महत्त्वाचे आहे, याचा सल्ला देणे ही ज्येष्ठांची जबाबदारी आहे. प्रथम, आपण मतदान करु आणि नंतर आम्ही म्हणू शकतो की हे चांगले आहे, हे चांगले नाही. परंतु जर आम्ही तसे केले नाही तर आम्हाला टीका करण्याचा अधिकार नाही,".
हेही वाचा