पुढारी ऑनलाईन डेस्क : कारगिल विजय दिवसाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (दि.२६) लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील द्रास येथे आलेले. यावेळी ते म्हणाले, "मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्या शूर सुपुत्रांना, ज्यांनी देशाला प्रथम स्थान दिले आणि त्यासाठी प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही, त्या शूर पुत्रांना मी सलाम करतो." (Kargil Vijay Divas)
१९९९ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल संघर्षात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. कारगिलच्या बर्फाळ उंचीवर शहीद झालेल्या शूरवीरांच्या स्मरणार्थ संरक्षण मंत्री यांनी येथील कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. ते स्मरणार्थ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणतात, "युद्ध हे फक्त दोन सैन्यांमधील नसून दोन राष्ट्रांमध्ये असते. २६ जुलै १९९९ रोजी युद्ध जिंकल्यानंतरही, जर आपल्या सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडली नाही, तर ते केवळ शांततेमुळेच आहे. आमचा भारतीय मूल्यांवर विश्वास आहे, आणि आमची आंतरराष्ट्रीय कायद्याशी बांधिलकी आहे. त्यावेळी जर आम्ही नियंत्रण रेषा ओलांडली नाही तर याचा अर्थ आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू शकत नाही असा होत नाही. भविष्यात आवश्यकता असेल तर एलओसी ओलांडू.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही कारगिल युद्ध स्मारकावर शहीद जवानांना पुष्पांजली अर्पण केली. त्याचबरोबर नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनीही शूरवीरांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS), जनरल अनिल चौहान यांनीही कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला.
हेही वाचा