kareena kapoor khan 
Latest

kareena : करीनाचा ब्लॅक जंपसूटमध्ये दिसला हॉट अवतार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

दोन मुलांची आई असणाऱ्या करीना कपूर खानचं (kareena) सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते. हे फोटो पाहिल्यानंतर बॉलिवूडच्या बेबोला (करीना) ट्रोल करणाऱ्या ट्रोलचीही बोलती थांबणार आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि फिट दिसत आहे. (kareena)

काळ्या जंपसूटमध्ये हॉट अवतार

तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिचे या कार्यक्रमातील फोटोशूट सध्या चर्चेत आहे. करीनाचा हा स्वॅग पाहिल्यानंतर तिला ट्रोल करणाऱ्यांनीही बोलणे बंद केले आहे. हे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, ज्यांनी तिला 'म्हातारी' असा टॅग दिला होता, त्यांना या अभिनेत्रीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिने दुसरा मुलगा जेह अली खानच्या जन्मानंतर मेहनत घेऊन वजन कमी केले. व्यायाम करून तिने फिटनेस ठेवला आहे. बेबोच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटण्याचे नाव घेत नाहीयेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या कमेंट

बेबोने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पहिला फोटो मागच्या बाजूने क्लिक केला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहत आहे. करिनाचा हा अभिनय पाहून बॉलिवूड सेलिब्रिटीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. सोनम कपूर आहुजा, करिश्मा कपूर, नेहा धुपिया इत्यादी सेलिब्रिटींनी हार्ट इमोजीसह करीनाच्या या फोटोवर कमेंट केली. त्याचवेळी तिचा हा लूक पाहून एकता कपूर थक्क झाली. तिने कमेंट केली आणि लिहिलं – तू खूप छान दिसत आहेस, किती स्किनी आहे. करीनाची वहिनी सबा पतौडी यांनीही कमेंट करत 'स्टनिंग' असे लिहिले आहे.

या आगामी चित्रपटात दिसणार

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खान आणि करीना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९९४ मध्ये आलेल्या अमेरिकन चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा रिमेक आहे. यासोबतच, फॅशनिस्टाने सुजॉय घोष दिग्दर्शित ओटीटीच्या पदार्पणाची घोषणा केली आहे, जे जपानी लेखक केगो हिगाशिनो यांच्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या पुस्तकाचे स्क्रीन रूपांतर असल्याचे म्हटले जात आहे, ज्यात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT