Kiara- Sidharth 
Latest

Kiara- Sidharth : सिद्धार्थ- कियाराच्या लग्नानंतर करणचं मोठं गिफ्ट!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचे ७ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाले आहेत. ( Kiara- Sidharth ) दोघांचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही लग्नाला उपस्थित होता. करणने नवदांपत्याला मोठे गिफ्ट दिले आहे.

करणकडून सिद्धार्थ कियाराला ( Kiara- Sidharth ) मिळालेली भेट म्हणजे ३ बिग बजेट चित्रपट आहेत. 'शेरशहा चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर हीच जोडी पुन्हा एकदा तीन विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांची निर्मिती करण जोहर करणार आहे. सिद्धार्थ- कियाराने करणच्या धर्मा प्रोडक्शनशी एक करार केला आहे. त्यानुसार ही जोडी धर्मा प्रोडक्शनच्या ३ चित्रपटांत झळकणार आहे. त्यातील एक चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करतील, असे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT