Sunil Grover- Kapil Sharma 
Latest

Sunil Grover- Kapil Sharma : दुरावा मिटला; ७ वर्षांनंतर कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हर एकत्र ; फॅन्स म्हणाले…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन कपिल शर्मा आणि अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सात वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्रित प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. सात वर्षांपूर्वी कपिल शर्मा आणि सुनील ( Sunil Grover- Kapil Sharma ) दोघांमध्येम एका विमानात किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनी आजपर्यत एकत्रित काम केलेल नव्हतं. आता दोघेजण पुन्हा एकदा एकत्रित छोट्या पडद्यावर 'द ग्रेट इंडियन कपिल' या शोमध्ये दिसणार आहेत. नुकतेच या शोचे दोन एपिसोड पाहायला मिळाले आहेत.

संबंधित बातम्या 

कपिल शर्माने नुकतेच त्याच्या इंस्टाग्रामवर अभिनेता सुनील ग्रोव्हरला टॅग करत एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कपिल आणि सुनील विमानात फर्स्ट क्लासमध्ये एकत्रित बसलेले दिसत आहेत. तेथील एका टेबलवर एक ज्यूसचा ग्लास ठेवलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कपिलने लिहिले आहे की, 'मित्रांनो काळजी करू नका, ही एक छोटी फ्लाईट आहे'. कपिलची ही पोस्ट पाहून चाहते मात्र, जोरजोरात हसत मज्जा घेत आहेत. नेटकरी नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्संनीदेखील कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.

कॉमेडियन भारती सिंहने कमेंटमध्ये खूपसाऱ्या हसणारे इमोजी शेअर केले आहेत. तर अनुभव सिंग बस्सी यांनी लिहिले आहे की, 'हाहाहाहा'. यासोबत काही नेटकऱ्यांनी ज्यूसचा ग्लासची खिल्ली उडवत लिहिले आहे की, दोघांना एकत्र जागा कोणी दिली, ४-५ वर्षे वाया गेली. रिलॅक्स, यावेळी फक्त ज्यूस पीत आहेत. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या जात आहेत.

'द कपिल शर्मा शो'मध्ये डॉ. गुलाटी आणि गुत्थी यांच्या भूमिका साकारून सुनील ग्रोव्हरने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. पण ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या किरकोळ भांडणानंतर त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं. कपिल आणि सुनील त्यांचा शो संपवून ऑस्ट्रेलियाहून मुंबईला परतत येत असताना दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर सुनीलने कपिल शर्मा शोला अलविदा केला होता. ( Sunil Grover- Kapil Sharma )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT