Latest

कन्नड दिग्दर्शक एसके भगवान काळाच्या पडद्याआड

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: कन्नड चित्रपटसृष्टीसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे, दिग्दर्शक एसके भगवान यांचे बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते आणि वृद्धापकाळा संबंधित आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून एसके भगवान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो.

दोराई-भगवान जोडीने कन्नड चित्रपटसृष्टीला अनेक रुचकर चित्रपट दिले आहेत. डॉ आणि त्यांचे मित्र दोराई राज यांनी 'कस्तुरी निवास', 'एराडू सोयम', 'बायलू दारी', 'गिरी कान्ये', 'होसा लेकूक' यासह 55 चित्रपट दिग्दर्शित केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

5 जुलै 1933 रोजी जन्मलेल्या भगवान यांनी लहान वयातच हिरानैया मित्र मंडळींसोबत रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. 1956 मध्ये, त्यांनी कनागल प्रभाकर शास्त्री यांचे सहाय्यक म्हणून चित्रपट सृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. जेम्स बाँड शैलीतील चित्रपट बनवणारे ते पहिले कन्नड चित्रपट निर्माते होते.

दोराई राज यांचे निधन झाल्यानंतर भगवान यांनी दिग्दर्शनातून बराच ब्रेक घेतला होता.  त्यांचा शेवटचा चित्रपट 1996 मध्ये 'बाळोंदू चादुरंगा' हा होता. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी दिग्दर्शित केलेला 50 वा चित्रपट अडुवा गोम्बे सोबत चित्रपट सृष्टीत पुनरागमन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT