Kangana Ranaut  
Latest

Kangana Ranaut : कंगणा राणावत ठरणार दिल्लीच्या रामलीलावर ‘रावण दहन’ करणारी पहिली महिला

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कंगना राणावत मंगळवारी (दि.२४) दसऱ्याच्या मुहूर्तावर राजधानी दिल्लीतील लवकुश रामलीला येथे रावण दहन करणार आहे. लाल किल्ल्यावर दरवर्षी रावण दहन केले जाते. दरम्यान, ५० वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेलजेव्हा महिला बाण मारून रावणाच्या पुतळ्याचे दहन करेल, असे लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह म्हणाले आहेत. गेल्या महिन्यात संसदेने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सिंह म्हणाले आहेत. (Kangana Ranaut)

"फिल्मस्टार किंवा राजकारणी यापैकी दरवर्षी कोणतरी आमच्या इव्हेंटसाठी हजर असते. यापूर्वी आम्ही माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे. चित्रपट कलाकारांपैकी अजय देवगण आणि जॉन अब्राहम येथे आले होते. गेल्या वर्षी प्रभासने रावण दहन केले होते. आमच्या कार्यक्रमाच्या ५० वर्षात पहिल्यांदाच एक महिला रावण दहन करणार आहे," असेही सिंह यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. (Kangana Ranaut)

'आता एक महिलाही रावण दहन करु शकते' (Kangana Ranaut)

"महिलांना समान अधिकार हवे, असे लव कुश रामलीला समितीला वाटते. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, पण अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. महिलांच्या संसदेतील आरक्षणाच्या विधेयकामुळे देश आणि समाजाच्या विकासात मदत होईल. हे विधेयक समानतेची नांदी ठरेल. आपण संकुचित वृत्ती दूर करणे आवश्यक आहे," अशी आशाही समितीकडून व्यक्त करण्यात आली. (Kangana Ranaut)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT