पुढारी डिजीटल : सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबातच नेम नसतो. अतरंगी माणसं, जगावेगळ्या वस्तू आणि भरीस भर गोंधळ घालणारे पाळीव प्राणी यांचे रिल्स सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असतात. पण आता एक हटके व्हीडियो व्हायरल होतो आहे. यामध्ये चक्क गोणापाटाचा पलाझो दिसतो आहे.
अर्थात फॅशनच्या अतरंगी जगात अशी फॅशन नवी नाही. पण खरी गोम इथेच आहे. बाजारात अगदी अल्प किमतीत मिळणाऱ्या गोणपाटाचा पलाझो मात्र चक्क साठ हजारचा आहे. चक्रावलात ना ! नुकताच समोर आलेल्या या व्हीडियोमध्ये हा एका मॉलमधील या पलाझो दिसतो आहे. हा पलाझोवरचा प्राइस टॅगमात्र ६०००० चा दिसतो आहे. अर्थात यूझरनी मात्र हा पलाझो राणवीर सिंग उर्फी जावेदच घालू शकते अशा कमेंटही केल्या आहेत. पण गोणपाटच नाही तर या वस्तूंपासून बनवलेले कपडेही चर्चेचा विषय बनले आहेत.
सीम कार्ड : चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद हिने अलीकडेच असा ड्रेस घातला होता.
कॅरी बॅग : फॅन्सी ड्रेसची कमी खर्चातील हौस म्हणजे कॅरी बॅगपासून बनवलेला ड्रेस
यूज आणि थ्रो ग्लास : 'पिण्या'चा शौकीन असलेल्या व्यक्तिसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे.