पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : उत्तराखंडमधील जोशीमठ येथील भुस्खलनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि. १६ ) सुनावणी होणार आहे. जोशीमठ येथे जमीन धसत चालल्याने शेकडो घरांना तडे गेले आहेत. अशा घरांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश उत्तराखंड सरकारला दिले आहेत.(Joshimath Case)
जोशीमठ येथील भुस्खलनास राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात यावी, तसेच पीडित नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश सरकारला दिले जावेत, अशा विनंतीची याचिका अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. रहिवाशांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा व न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :