Latest

Jayant Patil tweet : जयंत पाटील यांचे गुरुपौर्णिमा शुभेच्छांचे ट्विट, “मी जो काही आहे, ते माझे गुरु…’

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज गुरुपौर्णिमा. राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आपला फोटो शेअर करत म्हटल आहे,"मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच. आदरणीय साहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा." (Jayant Patil tweet )

Jayant Patil tweet

माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. पवार (Ajit pawar latest) यांनी आज (दि. २) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत भूकंप झाला आहे. शरद पवार यांच्यासमवेत आम्ही आहोत म्हणणारे फोटो, पोस्ट, ट्विट व्हायरल होवू लागले. अस भावनिक वातावरण  सुरु आहे.

आज गुरुपौर्णिमा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमीत्त केलेले शुभेच्छांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी आपला आणि शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की,"भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच. आदरणीय साहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा."

Jayant Patil tweet : मी शरद पवारांसोबत….

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने (Ajit pawar latest) हादरले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि.2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे,  धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या फुटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केवळ दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली हाेती. मी शरद पवारांसोबत असे ट्विट पाटील यांनी केले हाेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT