पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिलेचे तो केस कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबने महिलेचे केस कापताना किळसवाणा प्रकार केलेला आहे. महिलेने आरोप केलेला आहे की, जावेद हबीबने थुंकी लावून केस कापलेले आहे. (Jawed Habib viral video)
व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जावेद हबीब हा केस कापताना पाण्याऐवजी थुंकी लावून केस कापतो. इतकंत नाही तर जावेद म्हणतो की, या थुंकीमध्ये जीव आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियामधून जावेद हबीबवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. त्याचबरोबर व्हिडीओनंतर महिलांच्याही रिॲक्शन्स समोर आलेल्या आहेत. मात्र, जावेद हबीबकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
संपूर्ण घटना अशी आहे की, जावेद हबीब हा व्हिडीओ मुजफ्फरनगरमधील आहे. व्हिडीओमध्ये जावेद एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलवतो. तिचे केस कापताना तो म्हणतो की, "माझे केस घाणेरडे आहे. कारण मी शॅम्पू लावलेला नाही. लक्ष लावून ऐका… जर पाण्याची कमी असेल ना…", असे वाक्य उच्चारून जावेद महिलेच्या केसांवर थुंकतो. (Jawed Habib viral video)
या प्रकारानंतर प्रेक्षकांमधून टाळ्या वाजविल्या जातात. मात्र, संबंधित महिला ही अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. जावेदने ज्या महिलेच्या केसांवर हा किळसवाणा प्रयोग केलेला आहे, त्या महिलेचे नाव पूजा गुप्ता आहे. या महिलेची प्रतिक्रिया आलेले आहे. ती म्हणते की, "माझं एक ब्युटी पार्लर आहे. मी जावेद हबीब यांचा सेमिनार अटेंड केला. त्यामध्ये त्यांनी गैरवर्तन केले. त्यांनी माझे केस कापताना थुंकीचा वापर करून माझे केस कापण्याचा प्रयत्न केला. पण मी केस कापून घेतले नाही. मी साध्या पार्लरमध्ये जाऊन केस कापेन. पण जावेद हबीबकडून कापणार नाही."