srk jawan movie  
Latest

Jawan Trailer : जवानचा धमाकेदार ट्रेलर भेटीला, शाहरुख खानची ॲक्शन पाहून डोळे विस्फारतील (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी आॅनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर आज ३१ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज झाला आहे. याआधी सोशल मीडियावर ट्रेलरबाबत चाहत्यांची प्रतीक्षा वाढत आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा ​​हे कलाकार दिसणार आहेत. यासोबतच दीपिका पदुकोणही कॅमिओ करताना दिसणार आहे. जवानच्या धमाकेदार टीझरने चाहत्यांची मनं आधीच जिंकली आहेत. आता जवानच्या ट्रेलरवरूनही अशाच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी म्हणजेच पुढच्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आज सर्वांच्या नजरा जवानच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटवर खिळल्या आहेत.

जवानविषयी परदेशांतही मोठी क्रेझ आहे. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग दमदार होत आहे. ट्रेड अॅनालिस्‍ट मनोबल विजयबालन यांच्यानुसार, अमेरिकेत जवानला ४५० हून अधिक ठिकाणी रिलीज करण्यात येत आहे. आता दुबईत होणाऱ्या शाहरुख खानच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटवर सवार्ंच्या नजरा टिकून आहेत.

'बुर्ज खलीफा'वर होणार लॉन्च

आज रात्री साडेदहा वाजता दुबईमध्ये बुर्ज खलीफावर 'जवान' का ट्रेलर लॉन्च केला जाईल. रेड चिली एंटरटेनमेंटने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT