Latest

Jalna Gram Panchayat Elction Result 2022 : जालना जिल्ह्यातील लोणी, आष्टी ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

मोहन कारंडे

जालना; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील लोणी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना लोणी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यात यश आले आहे. तर परतूर तालुक्यातील सर्वात मोठी आष्टी ग्रामपंचायतवरही भाजपने विजय मिळवला आहे.

जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील शेवगाव व पाडळी, भोकरदन तालुक्यातील मनापूर, भिवपूर, जाफराबाद तालुक्यातील खानापूर, बुटखेडा, मंठा तालुक्यातील आनंदवाडी कोकर्सा व गुळखंडी, अंबड तालुक्यातील वाघलखेडा घनसावंगी तालुक्यातील गाडे सावरगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

घनसावंगी तालुक्यातील भादली ग्रामपंचायतमध्ये शुभम तौर ९२२ मतांनी विजयी झाले आहेत. अरगडे गव्हाण येथे रजनी गुजर विजयी झाले आहेत. बानेगाव ग्रामपंचायतमध्ये कविता शिंदे २११ मतांनी विजयी झाल्या तर अंतरवाली राठी ग्रामपंचायमध्ये रामप्रसाद सांगळे विजयी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT