जळगाव : पुढारी वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडीने रावेरनंतर जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले व सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्ल रायचंद लोढा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जळगाव लोकसभा निवडणूकीबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता लोढा यांनी होकार दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मध्ये राजकीय उलथापालखीनंतर उमेदवार जाहीर होताना दिसत आहेत. भाजपाला रामराम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत व राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या दोन्ही भाजपाचे उमेदवारांना उमेदवारी देऊन भाजपा समोर एक आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांनी उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने ही रावेर लोकसभेमध्ये संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी देऊन आपला पहिला उमेदवार जळगाव जिल्ह्यात दिला होता. त्यानंतर जळगाव लोकसभेसाठी प्रफुल्ल रायचंद लोढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी होकार सुद्धा दिला आहे. गिरीश महाजन यांचे जवळचे व भाजपात असलेले प्रफुल्ल लोढा यांनी काही काळानंतर भाजपाला रामराम करत कोरोना काळात राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीला रामराम करून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा त्यांनी हाती घेतलेला आहे.
हेही वाचा: