jayshankar visit to mozambiqe 
Latest

Jaishankar Visit Mozambique : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी मापुतो येथे केला ‘मेड इन इंडिया’ ट्रेनमध्ये प्रवास

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Jaishankar Visit Mozambique : EAM जयशंकर हे सध्या मोझांबिच्या दौऱ्यावर आहेत. 13 ते 15 एप्रिल दरम्यान हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी मोझांबिकन वाहतूक मंत्री यांच्या सोबत देशाची राजधानी मापुटो येथे मेड इन इंडिया ट्रेनमध्ये प्रवास केला. याचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर टाकला आहे. तसेच त्यांनी भेटी दरम्यानचे अन्य मुद्दे देखील ट्विट केली आहे.

मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. जयशंकर गुरुवारी मापुतो, मोझांबिक येथे दाखल झाले. मोझांबिकनने त्यांचे जोरदार स्वागत केले. EAM जयशंकर हे आफ्रिकन राष्ट्रासोबत भारताचे "मजबूत द्विपक्षीय संबंध" अधिक दृढ करण्यासाठी 13-15 एप्रिल दरम्यान मोझांबिकच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी जयशंकर हे मोझाम्बिकला पोहोचले. तिथे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री मॅन्युअल जोस गोन्काल्व्हस यांचे हार्दिक स्वागत केले.

यावेळी जयशंकर यांनी मापुटो येथे मेड मोझांबिकचे वाहतूक मंत्री मॅटस मॅगोला यांच्यासोबत मेड इन इंडिया ट्रेनमध्ये प्रवास केला. या प्रवासात रेल्वे इंडिया टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसचे (RITES) मुख्य व्यवस्थापकीय संचालक राहुल मिथल हे देखील सहभागी झाले होते. त्याबद्दल जयशंकर यांनी त्यांचे कौतुक केले.

Jaishankar Visit Mozambique : ट्रेनमध्येच घेतली पत्रकार परिषद

या दरम्यान तिथे चालत्या ट्रेनमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. याचा अनुभव मांडताना जयशंक यांनी "एक अभिनव अनुभव: चालत्या ट्रेनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करणे," असे लिहिले आहे. मापुटो येथील उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात भारतीय समुदायाचे प्रतिनिधी आणि भारतातील मित्रांना भेटताना, जयशंकर यांनी दोन्ही राष्ट्रांमधील काल-परीक्षित आणि ऐतिहासिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.

EAM ने गुरुवारी मापुटो येथे पत्रकार परिषदेत मोझांबिक विधानसभेचे अध्यक्ष एस्पेरांका बायस यांच्या गेल्या वर्षीच्या भारत भेटीचे स्मरण केले. ते म्हणाले, "दोघांनी त्यांच्या राजकीय सहकार्याचा आणि आर्थिक सहकार्याचा आढावा घेतला. आमच्या द्विपक्षीय भागीदारीचा अधिक विस्तार करण्यासाठी एस्पेरांका यांनी मला आग्रह केला. येत्या दोन दिवसांत मी तेच करणार आहे."

जयशंकर म्हणाले की भारत आणि मोझांबिकसाठी "या भेटीची ही खूप चांगली सुरुवात आहे आणि मला खात्री आहे की पुढील काही दिवसांमध्ये, आणखी अनेक महत्त्वपूर्ण संभाषणे होतील," ते म्हणाले.

BRICS स्वतःच्या चलनांमध्ये व्यापार करण्याचा विचार करत आहे का, असे विचारले असता, EAM म्हणाले: "व्यापार समझोता ही अशी गोष्ट आहे ज्यावर विविध देश चर्चा करत आहेत. ही अशी गोष्ट नाही जी आपण BRICS मध्ये चर्चा करत आहोत. या विषयावर देशांची वेगवेगळी वैयक्तिक भूमिका आहे."

Jaishankar Visit Mozambique : महादेव मंदिराला दिली भेट

भेटी दरम्यान जयशंकर यांनी मापुतो येथील श्री विश्वंभर महादेव मंदिराला भेट दिली. येथे त्यांनी प्रार्थना करून भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतीय समुदायासी संवाद साधताना खूप आनंद झाला, असे जयशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT