Latest

शंभर वर्षे जुन्या पोशाखाच्या गुप्त खिशातील ‘ती’ चिठ्ठी…

Arun Patil

वॉशिंग्टन : कधी कधी काही घटनांची वर्णने वाचत असताना आपल्याला शेरलॉक होम्सची कथा वाचत असल्यासारखे वाटत असते. असाच एक प्रकार शंभर वर्षे जुन्या पोशाखाबाबत घडलेला आहे. या जुन्या पोशाखातील छुप्या खिशात हाताने लिहिलेल्या काही नोट्स आढळल्या. त्यामध्ये काय लिहिले आहे याचा मात्र उलगडा होत नव्हता. ते शोधण्यासाठी दहा वर्षे लागली. आता त्याचे रहस्य लोकांसमोर आले आहे.

हा पोशाख सिल्कचा म्हणजेच रेशमी असून तो सन 1880 मधील आहे. हा पोशाख 2013 मध्ये अमेरिकेच्या एका जुन्या मॉलमध्ये सारा रिव्हर कोफिल्ड यांना सापडला. त्या डिजिटल आर्कियोलॉजिकल रेकॉर्ड नावाची संस्था चालवतात. ड्रेसच्या सिक्रेट पॉकेटमध्ये त्यांना काही नोट्स सापडल्या. त्या हातानेच लिहिलेल्या होत्या, पण त्यामधील मजकूर समजत नव्हता. त्यामधील शब्द अनाकलनीय होते. रिव्हर कोफिल्ड यांनी या नोट्स ऑनलाईन पोस्ट केल्या जेणेकरून लोकांपैकी कुणीतरी त्याचा अर्थ सांगू शकेल.

काही लोकांनी त्यांना सांगितले की यावरील मजकूर कदाचित टेलीग्रामसाठी लिहिला गेला असेल. त्यावेळी टेलिग्राम पाठवणे ही एक सामान्य बाब होती. मात्र मजकुराचा अर्थ समजून घेण्यासाठी दहा वर्षे लागली. मॅनिटोबा युनिव्हर्सिटीतील अभ्यासक वेन चेन यांनी या नोट्समधील अर्थ सांगितला. यामधील मेसेज तसाच आहे जसा वातावरणाची चर्चा करण्यासाठी अमेरिकन सेना सिग्नलद्वारे वापरल्या जाणार्‍या कोडचे असतात.

चेनी यांनी यासाठी 1892 मधील वातावरणाशी संबंधित टेलिग्राम कोड बुकची मदत घेतली. हे पुस्तक मेरीलँडच्या एका ग्रंथालयात ठेवलेले आहे. यामधून त्यांना समजले की हा मेसेज सिग्नल सर्व्हिस हवामान केंद्राकडून आला होता. हे केंद्र अमेरिका आणि कॅनडात हवामानाबाबत कोडमध्ये टेलिग्राम पाठवत असे. मेसेजमधील प्रत्येक ओळींमध्ये हवामानाशी संबंधित कोड आहेत. सध्याच्या नॉर्थ डकोटा क्षेत्रातील हवामान कसे आहे याबाबतची माहिती यामध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT