Irrfan Khan  
Latest

Irrfan Khan Death Anniversary : वडील इरफान खान यांच्या आठवणीत बाबिल भावूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा आज चौथा स्मृतीदिन आहे. (Irrfan Khan Death Anniversary) अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने इन्स्टाग्रामवर वडिलांचे अनेक फोटो शेअर करून त्यांची आठवण केली आहे. पोस्ट लिहिताना बाबील खूप भावूक झालेला दिसतो.

इरफान खान भारतीय सिनेमातील सर्वात दमदार अभिनेत्यापैकी एक होते. ते आज या जगात नसले तरी दमदार अदाकारीच्या जोरावर ते फॅन्सच्या मनात आजदेखील जीवंत आहे. आता बाबिलने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. (Irrfan Khan Death Anniversary)

बाबिलने इन्स्टाग्रामवर इरफान यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका पक्ष्याला दाणे भरवतानाचा इरफान खानचा एक फोटो आहे. दुसरी फोटोमध्ये ब्लू कलरचा शर्ट घालून चष्मा लावलेल्या स्टाईलमध्ये ते दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये इरफान अंग्रेजी मीडियम चित्रपटाच्या सेटवर दिसत आहेत. त्यांच्यासोबत दीपक डोबरियाल देखील दिसत आहेत.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत इरफानचा लेक बाबिल खानही अभिनयात करिअर करत आहे. तो सोशल मीडियावरही खूपच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून बाबिलला वडील इरफान खानची आठवण येत आहे. नुकतेच त्याने एक पोस्ट शेअर केली होती. कधी कधी वाटते की हार मानून वडिलांकडे जावे, असे बाबिलने पोस्टमध्ये म्हटले होते. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता बाबिलने पुन्हा इरफानसाठी एक पोस्ट केली आहे, त्याच्या इन्स्टाग्रामवरून इरफानचे काही फोटो शेअर केले आहेत. तो म्हणतो की, तुम्ही मला योद्धा बनायला शिकवले. पण, त्याबरोबरच प्रेम आणि दयाळूपणाही शिकवला. तुम्ही लढायला शिकवले. तुमचे चाहते नव्हते तर ते कुटुंब होते. मी तुम्हाला वचन देतो की, आपल्या माणसांसाठी आणि कुटुंबासाठी मी लढेन. मी कधीच हार मानणार नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुम्ही कोणताही गॉडफादर नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर बॉलीवूडमध्ये नाव कमावलं. केवळ बॉलीवूडच नाही तर त्याने हॉलीवूडमध्येही अभिनयाचा डंका वाजवला.

बाबिलने ओटीटीवर 'काला' मधून अभिनयाची सुरुवात केली होती. यानंतर ते 'द रेल्वे मॅन'मध्ये दिसला. आता बाबिल शूजित सरकारच्या 'द उमेश क्रॉनिकल्स'मध्ये अमिताभ बच्चन सोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT