Latest

Afghanistan vs Ireland : आयर्लंडने मिळवला पहिला कसोटी विजय

Arun Patil

अबुधाबी, वृत्तसंस्था : आयर्लंडसाठी एक मार्चचा दिवस त्यांच्या क्रिकेट इतिहासात अतिशय संस्मरणीय ठरला. आयरिश संघाने अबुधाबी येथील मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan vs Ireland) एक सामन्याची कसोटी मालिका 6 गडी राखून जिंकली, ज्यामध्ये कर्णधार अँड्रयू बालबर्नीने टार्गेटचा पाठलाग करण्यात आणि विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयर्लंडचा कसोटी क्रिकेटमधला हा पहिलाच विजय आहे. याआधी संघ 7 कसोटी सामने खेळला आहे आणि त्या सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 54.5 षटकांत इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकाच्या जोरावर 155 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयरिश संघाने 83.4 षटकांत स्टर्लिगच्या 263 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍या डावात 75.4 षटकांत 218 धावा केल्या होत्या. यानंतर आयरिश संघाने 31.3 षटकांत 4 गडी गमावून 111 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात 111 धावांचा पाठलाग करताना आयरिश संघाने एकवेळ 13 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. इथून कर्णधार अँड्रयू बालबिर्नीने एका बाजूने डाव सांभाळत प्रथम पॉल स्टर्लिंगसोबत चौथ्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. त्यानंतर लॉर्कन टकरसोबत पाचव्या विकेटसाठी 72 धावांची मॅचविनिंग भागीदारी करत संघाला 6 विकेटस्नी ऐतिहासिक विजय मिळवून परतला. आयरिश कर्णधाराने या डावात 96 चेंडूंत नाबाद 58 धावा केल्या. आयर्लंड संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नाही.

गोलंदाजीत मार्क अडायरची कमाल (Afghanistan vs Ireland)

या सामन्यात आयर्लंड संघाच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली, ज्यात वेगवान गोलंदाज मार्क अडायरने पहिल्या डावात 5 विकेटस् घेतल्या. त्याचबरोबर दुसर्‍या डावातही तो 3 विकेटस् घेण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे, दोन्ही डावांतील फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला पहिल्या डावात केवळ 155 धावा करता आल्या, तर दुसर्‍या डावात 218 धावांपर्यंत मजल मारता आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT