Latest

इराककडून सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेतून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी (दि.२१) इराकने सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट डागले. इराकच्या जुम्मर शहरातून ईशान्य सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर किमान पाच रॉकेट डागण्यात आले, असे दोन इराकी सुरक्षा सूत्रांनी सांगितले. फेब्रुवारीनंतर इराकमधील इराण-समर्थित गटांनी अमेरिकन सैन्यांविरुद्धचे हल्ले थांबवल्यानंतर अमेरिकन सैन्यावर हा पहिला हल्ला आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार एका छोट्या ट्रकच्या मागे बसवलेले रॉकेट लाँचर सीरियाच्या सीमावर्ती शहर झुम्मरमध्ये तैनात करण्यात आले होते. लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, विमाने आकाशात असताना, फायर न केलेल्या रॉकेटच्या स्फोटामुळे ट्रकला आग लागली. एका लष्करी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "आम्ही तपास करेपर्यंत अमेरिकन युद्ध विमानांनी ट्रकवर बॉम्बफेक केली होती की नाही याची पुष्टी करू शकत नाही."

झुम्मर शहरातील एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, इराकी सुरक्षा दलांना या भागात तैनात करण्यात आले आहे. त्यांनी दुसऱ्या वाहनाचा वापर करून परिसरातून पळून गेलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. इराकी सुरक्षा मेडिका सेलने एका निवेदनात म्हटले आहे की, इराकी सैन्याने सीरियाच्या सीमेजवळ गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी एक मोठी शोध मोहीम सुरू केली आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT