file photo 
Latest

Iraq Bus Accident : इराकमध्ये बसची ट्रकला धडक; ९ तीर्थयात्रेकरूंचा मृत्यू; ३१ जखमी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : इराकच्या दक्षिणेकडील शहर नासिरियामध्ये बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात ९ ईराणी तीर्थयात्र्यांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात अनेक लोक जखमी झाले. ईराणमधील हे सर्व तीर्थयात्री बसने शिया मुसलमानांच्या पवित्र शहर कर्बलाला जात होते. या दरम्यान, प्रवाशांनी भरलेल्या बसने ट्रकला धडकली. मीडिया रिपोर्टनुसार, महिला आणि मुलांसह ३१ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाचची प्रकृती गंभीर आहे.

एएनआयने रॉयटर्सच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. समाचार एजंसी रॉयटर्सने वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की हा अपघात दक्षिण इराकी शहर नासिरियामध्ये झाला आहे. बसमध्ये सवार सर्व प्रवासी तीर्थयात्रा करण्यासाठी जात होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT