Latest

धोनी मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ठरणार जगात भारी कर्णधार

backup backup

आयपीएल २०२१ ची फायनल उद्या शुक्रवारी ( १५ ऑक्टोबर ) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. महेंद्रसिंह धोनी नेतृत्व करत असलेल्या सीएसकेला आपले चौथे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. तर केकेआर तिसऱ्या विजेतेपदासाठी आपला जोर लावणार आहे. हा अंतिम सामना सीएसकेचा कर्णधार धोनीसाठी खास आहे.

महेंद्रसिंह धोनी या सामन्यात ज्यावेळी सीएसकेचे नेतृत्व करण्यासाठी उतरेल त्यावेळी तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने आतापर्यंत ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद आणि दोनवेळा टी-२० चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. याचबरोबर धोनीने भारताला पहिला वर्ल्ड टी-२० कपही जिंकून दिला होता.

धोनी ज्यावेळी केकेआरविरुद्ध अंतिम सामन्यात सीएसकेचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल त्यावेळी तो कर्णधार म्हणून आपला ३०० वा टी-२० सामना खेळेल. टी-२० क्रिकेटमधील इतिहासात आतापर्यंत ३०० सामन्यात नेतृत्व करण्याची कामगिरी फक्त धोनीच करेल. यामुळे ३०० टी-२० सामन्यात नेतृत्व करणारा धोनी हा जगातील पहिला कर्णधार ठरणार आहे. धोनीने आतापर्यंत २९९ टी-२० सामन्यात नेतृत्व केले आहे. यातील १७६ सामन्यात संघाने विजय मिळवला आहे तर ११८ सामन्यात संघाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

धोनी नेतृत्व करत असलेल्या सीएसकेसाठी केकेआर अवघड पेपर

केकेआर आणि सीएसके यांच्यात २०१२ साली देखील आयपीएलचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात सीएसकेने दमदार फलंदाजी करत केकेआर समोर १९० धावांचे लक्ष्य ठवले होते. सीएसकेने २० षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १९० धावांचा डोंगर उभारला होता.

मात्र केकेआरने देखील हे धडाकेबाज फलंदाजी करत शेवटच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता. केकेआरकडून मलविंदर बिस्लाने ८९ धावांची खेळी केली होती. तर जॅक कॅलिसने ४९ चेंडूत ६९ धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले होते.

धोनी कधी निवृत्त होणार?

धोनीचा फलंदाजीमधील फॉर्म पाहता तो फार काळ फ्रेंचायजी क्रिकेट खेळण्याची शक्याता कमी आहे. आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु असतानाच हा धोनीचा अखेरच्या हंगाम असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र खुद्द धोनीने एका लाईव्ह चॅट दरम्यान आपण चेन्नईत खेळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तो भारतात होणाऱ्या आयपीएलच्या पुढच्या सत्रातही पिवळ्या जर्सीत दिसेल असे संकेत मिळाले. त्याने चेन्नईत फॅन्स समोर निवृत्त होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.

मात्र त्याने हेही स्पष्ट केले की पुढे काय होणार आहे हे त्यालाही माहीत नाही. पुढच्या वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यावेळी कोणती रणनीती समोर येईल हे सांगता येत नाही. मी एक खेळाडू म्हणून संघाशी जोडलेला असेन की नाही याबाबत मी काहीही सांगू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT