Latest

Asia Cup INDvsSL : धोनी-कोहलीचे ‘हे’ श्रीलंकन मित्रच टीम इंडियासाठी धोकादायक!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hasaranga-Teekshna : टीम इंडिया आज आशिया चषकच्या सुपर 4 फेरीत आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रोहित ब्रिगेडचा सामना श्रीलंकेशी असून हा सामनाही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असल्यास टीम इंडियाला आजचा सामना जिंकावाच लागेल. पण यात श्रीलंकेचे दोन खेळाडू टीम इंडियासाठी धोका ठरू शकतात, टीम इंडियाला त्यांच्यापासून विशेष सावध राहावे लागणार आहे. हे खेळाडू आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके आणि विराट कोहलीचा संघ आरसीबीकडून खेळतात. त्यांची नावे आहेत महिष तेक्षाना (mahish teekshna) आणि वानिंदू हसरंगा (wanindu hasarang).

वानिंदू हसरंगा आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो…

आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळणारा वानिंदू हसरंगा भारतीय संघासाठी मोठा धोका बनू शकतो. तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. भारताविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वानिंदू हसरंगाबद्दल सांगायचे तर, त्याने सहा सामन्यांत दहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे हे आकडे त्याच्याकडचे कौशल्य सिद्ध करतात. दुसरीकडे, यंदाच्या आशिया चषक स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, हसरंगाने आतापर्यंत तीन सामन्यांत तीन बळी घेतले आहेत. चांगली फलंदाजी करण्यातही तो निष्णात खेळाडू आहे.

यानंतर भारतीय संघाला दुसरा धोका महिष तेक्षानाचा असू शकतो. तेक्षाना या आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेकडून खेळत होता आणि त्याने चांगली कामगिरी केली आहे. आशिया चषक 2022 मध्ये त्यांने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. (Hasaranga-Teekshna Asia Cup 2022 IND vs SL)

दुबईची खेळपट्टी संथ होत चालली आहे….

विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू फिरकीपटू आहेत. तर दुसरीकडे दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर सातत्याने सामने खेळवले जात असल्याने ही खेळपट्टीही मंदावली आहे. अशा स्थितीत भारताला या दोन फिरकी गोलंदाजांपासून सावध राहावे लागेल. हसरंगा आणि तेक्षाना या दोघांकडे भारताची मधली फळी उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे.

आयपीएलमध्ये खेळल्यामुळे श्रीलंकेच्या हसरंगा आणि तेक्षाना या दोघांनाही भारतीय संघातील खेळाडूंची ताकद आणि कमकुवतपणा चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्यांच्यापासून सावध रहावे लागेल. विशेष करून फलंदाजांना दोघांच्या गोलंदाजीवर फटके मारताना बाद न होण्याची काळजी घ्यावी लागेल. खरंतर टीम इंडियाचे श्रीलंकेविरुद्धचे रेकॉर्ड चांगले आहे, पण स्पर्धेतील आजचा सामना करो या मरो असाच आहे. (Hasaranga-Teekshna Asia Cup 2022 IND vs SL)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT