IPL Final 2023 
Latest

IPL Final 2023 : अंतिम सामना जिंकण्यासाठी चेन्नईला १५ षटकांमध्ये १७० धावांचे आव्हान

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा महाअंतिम सामना आज (दि. २९ ) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या सोळाव्या सत्राचा चॅम्पियन बनण्यासाठी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने आहेत. टॉस जिंकत चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या आणि वृद्धीमान सहाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१४ धावा केल्या असून चेन्नईसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे ३ चेंडूमध्ये ४ धावा चेन्नईने काढल्या आणि सामना पावसामुळे थांबला होता. (IPL Final 2023)

अंतिम सामना जिंकण्यासाठी चेन्नईला १५ षटकांमध्ये १७० धावांचे आव्हान

दरम्यान, पावसामुळे थांबलेला सामना १२.१० मिनीटांनी सुरु होणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी १५ षटकांमध्ये १७१ धावा कराव्या लागणार आहेत. शिवाय एका गोलंदाजाला ४ ऐवजी ३ षटक टाकणे मर्यादित असणार आहे. (IPL Final 2023) 

चेन्नईचा संघ – ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक चहर, मथीशा पथीराणा, तुषार देशपांडे, महिश तीक्ष्णा (IPL Final 2023)

गुजरातचा संघ – वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी (IPL Final 2023)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT