मोजण्यात आले आहेत 
Latest

IPL Auction : शिखर धवन आता पंजाब किंग्जसाठी तर, आर. अश्विन राजस्थान रॉयल्ससाठी खेळणार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूरमध्ये सुरू असलेल्या आयपीएलचा महालिलाव सुरु सुरू आहे. यात शिखर धवनसाठी पंजाब किंग्जकडून ८.२५ कोटी मोजण्यात आले आहेत. शिखर धवनची बेस प्राईस ही २ कोटी रूपये इतकी होती. तर आर. अश्विन साठी राजस्थान रॉयल्सने ५ कोटी मोजले आहेत. आर अश्विनची बेस प्राईज देखील २ कोटी रूपये इतकीच होती. (IPL Auction)

हा लिलाव मोठा असल्याने संघांना कमीत कमी 18 खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू (कॅप आणि अनकॅप) यांना मागणी अधिक असेल. त्यामुळेच गेल्यावर्षी 'पर्पल कॅप' जिंकणार्‍या हर्षल पटेलची आधारभूत किंमत दोन कोटी आहे. या रकमेच्या पाच पट किंमत त्याला मिळू शकते.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंटस् हे नवीन संघ आल्याने दहा संघांचा दोनदिवसीय लिलावात समावेश आहे. लिलावात 590 क्रिकेटपटूंवर बोली लागेल, ज्यामध्ये 227 विदेशी खेळाडू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT