IPL 2024

IPL 2024 : धोनीच्या CSKला प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : महेंद्रसिंग धोनीचा संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या 17 व्या हंगामात चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. रविवारी त्यांनी साखळी फेरीतील आपला 7वा सामना जिंकला. या विजयासह हा संघ आता प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज दिसत आहे. पण त्यांचे रेकॉर्ड अडचणी निर्माण करू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे धोनीच्या संघाला खूप सावध राहण्याची गरज आहे.

  • सीएसकेला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचेचण्यासाठी शेवटचा सामना जिंकणे आवश्यक
  • सीएसकेचा साखळी फेरीतील शेवटचा सामना आरसीबी विरुद्ध रंगणार
  • हा सामना आरसीबीचे होम ग्राउंड एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार
  • त्यामुळे हा सामना जिंकणे सीएसकेसाठी धोकादायक ठरू शकते

IPL 2024 : शेवटचा सामना आरसीबी विरुद्ध

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसके चेपॉकवर त्यांचा स्पर्धेतील 13 वा सामना खेळला. ज्यात त्यांनी संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा (आरआर) 5 विकेट राखून पराभव केला. आता 18 मे रोजी त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळला जाणार आहे. ही लढत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध रंगणार आहे. हा सामना आरसीबीचे होम ग्राउंड एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे ही एकमेव गोष्ट आहे जी सीएसके संघासाठी धोकादायक ठरू शकते.

खरं तर, यंदाच्या हंगामात आतापर्यंत चेन्नई संघाने चेपॉकवर 13 पैकी 7 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी 5 सामने जिंकले आहेत. तर उर्वरित 6 सामने त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त 2 सामने जिंकता आले आहेत.

आता सीएसकेला साखळी फेरीतील शेवटचा आणि महत्त्वाचा सामना विरोधी संघाच्या मैदानावर खेळायचा आहे. अशा स्थितीत चेन्नई संघाला आपले पराभवाचे रेकॉर्ड सुधारावे लागेल, अन्यथा ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात.

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई संघाचे निकाल

घरच्या मैदानावर खेळले गेलेले सामने : 7

विजय : 5, पराभव : 2

प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडवर खेळले गेलेले सामने : 6

विजय : 2, पराभव : 4

आयपीएलच्या एकाच मैदानावर सर्वाधिक विजयाचा विक्रम

52 विजय : कोलकाता नाईट रायडर्स (इडन गार्डन्स)
52 विजय : मुंबई इंडियन्स (वानखेडे स्टेडियम)
50 विजय : सीएसके (चेपॉक)
42 : आरसीबी (एम चिदंबरम)
37 : आरआर (जयपूर-सवाई मानसिंग)

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनेर, सिमरंजीत सिंधू, एन. सोलंकी, महिश तिक्षिना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान आणि अवनीश राव अरावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT