IPL 2024

IPL 2024 MS Dhoni : एमएस धोनी वेदनेने हैराण, तरीही CSK साठी घेतोय जोखीम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय नोंदवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल 2024 मध्ये 12 गुण झाले. या विजयाने सीएसकेचे प्लेऑफच्या शर्यतीमधील आव्हान कायम राहिले. पण हा सामना या सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी काही खास राहिला नाही.

धोनी नवव्या क्रमांकावर आला (IPL 2024 MS Dhoni)

पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात धोनी पहिल्यांदाच आपल्या टी-20 कारकिर्दीत नवव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरला. त्यावेळी 19 वे षटक सुरू होते. पुढील काही चेंडूवर धोनी आक्रमक खेळ करून चौकार षटकारांचा पाऊस पाडेल असे वाटत होते. पण तो गोल्डन डकचा बळी ठरला. पहिल्याच चेंडूवर हर्षल पटेलने धोनीला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. खरेतर धोनीचे नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येणे अनेकांसाठी धक्कादायक होते. काहींनी तर या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.

धोनीला दुखापत (IPL 2024 MS Dhoni)

धोनीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. वास्तविक, एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, धोनीच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो जास्त धावू शकत नाही. यामुळेच तो शेवटच्या एक-दोन षटकांत फलंदाजीला येतो. जेणेकरून त्याला एकेरी, दुहेरीसाठी पळून धावा कराव्या लागणार नाहीत.'

धोनीला खेळायला भाग पाडले जात आहे?

चेन्नई सुपर किंग्जच्या सूत्रानुसार, धोनीला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली होती. मात्र या दुखापतीनंतरही तो संघासोबत राहिला आणि प्रत्येक सामन्यात सहभागी होत राहिला. याचे एक कारण म्हणजे धोनीशिवाय संघात दुसरा कोणताही यष्टिरक्षक फलंदाज नाही. वास्तविक, डेव्हन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएलच्या या हंगामात सहभागी होऊ शकलेला नाही. सीएसकेनेही कॉनवेच्या जागी वेगवान गोलंदाजाचा समावेश केला. त्यामुळे संघाकडे यष्टिरक्षक नसल्याने औषध घेऊन धोनीलाच मैदानात उतरावे लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT