IPL 2024

IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, मुंबई इंडियन्सच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचा पहिला हंगाम खूपच खराब गेला. शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पंड्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. या हंगामात, मुंबई इंडियन्ससोबत असे काही घडले आहे जे आयपीएलच्या इतिहासात त्यांच्या संघासोबत यापूर्वी कधीही घडले नव्हते.

पंड्याच्या नेतृत्वाखाली एमआयची अवस्था वाईट (IPL 2024)

या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एमआयला केकेआरविरुद्ध ईडन गार्डन्स आणि वानखेडे स्टेडियमवर एकाच हंगामात पराभवाचा सामना करावा लागला. याआधी कोणत्याही कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला इतक्या वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागलेले नाही.

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा 'असे' घडले (IPL 2024)

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यातील 9 सामने गमावले असून 4 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात एमआयने एका हंगामात 9 किंवा त्याहून अधिक सामने गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांने 2022 मध्ये 10 सामने गमावले होते.

आयपीएलच्या एका हंगामात मुंबईचे सर्वाधिक पराभव

10 पराभव : 2022
9 पराभव : 2024
8 पराभव : 2009
8 पराभव : 2014
8 पराभव : 2018

एमआय प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

मुंबई इंडियन्स हा आयपीएल 2024 च्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. असे दुस-यांदा घडले आहे. त्यामुळे पंड्या हा मुंबईचा दुसरा कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ आयपीएल हंगामाच्या प्लेऑफमधून सर्वात प्रथम पडावे लागले आहे.

SCROLL FOR NEXT