Latest

MS Dhoni Retirement : आयपीएलची फायनल असेल धोनीची शेवटची मॅच? निसर्गाने घडवला ‘हा’ विशेष योगायोग

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Retirement : आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी होणार होता आणि गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. पण आनंदाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सामना रिझर्व्ह डेवर खेळवण्यात येणार आहे. आयपीएल 2023 चा अंतिम सामना आता सोमवारी 29 मे रोजी होणार आहे.

दरम्यान, एमएस धोनीचा हा शेवटचा आयपीएल सामना असेल या कारणासाठी चाहत्यांनी अहमदाबादच्या स्टेडियमवर मोठ्या संख्येने गर्दी केली. हे चाहते आता पुन्हा रिझर्व्ह डेला सुद्धा मैदानात उपस्थित असतील. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की धोनीचा हा खरच शेवटचा सामना असेल का? कारण यंदा आयपीएलच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत राहिली आहे. धोनीचा यंदा शेवटचा हंगाम असेल, असे काही जाणकरांनी मत व्यक्त केले. सामना संपल्यानंतर समालोचकांनीही अनेकवेळा धोनीला त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीविषयी प्रश्न विचारले. पण धोनीने आपल्याकडे या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी अजून 9 ते 10 महिने आहेत, असे सांगून प्रश्नाला बगल दिली.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ गेल्या मोसमात 9व्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर 2023 च्या हंगामात थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा हा पहिला संघ बनला. सीएसकेने विक्रमी 12व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आणि विक्रमी 10 व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. आता धोनीसमोर सलग दुसरी फायनल खेळणाऱ्या हार्दिक सेनेचे आव्हान असेल. अशातच आता निसर्गाने एक खास योगायोग घडवला आहे, ज्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की कदाचित हा धोनीचा शेवटचा आयपीएल सामना असू शकतो. हा योगायोग खूप खास आहे आणि अनेकांना तो जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटेल. चला तर जाणून घेऊया तो विशेष योगायोग… (MS Dhoni Retirement)

2019 च्या विश्वचषकातील उपांत्य सामना आठवून बघा

धोनी टीम इंडियासाठी 2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचा शेवटचा सामना खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात धोनी दुर्दैवाने अशा प्रकारे धावबाद झाला की चाहत्यांना त्याला पुन्हा निळ्या जर्सीमध्ये फलंदाजी करताना पाहता आले नाही. धोनीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आणि एका वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर, सर्वांच्या लाडक्या माहीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. त्या सामन्यात निर्सर्गाने जसे काही घडवले ते यावेळी आयपीएलमध्ये पाहायला मिळत आहे. (MS Dhoni Retirement)

तो विशेष योगायोग काय आहे? (MS Dhoni Retirement)

वर्ल्ड कप 2019 ची सेमीफायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होती. त्या सामन्यातही पावसाने अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे बाद फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. असेच काहीसे आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये पाहायला मिळाले. आता हा सामना 29 मे रोजी होणार आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना राखीव दिवशी संपला. आता प्रश्न असा आहे की यंदाच्या आयपीएलचा सामना हा धोनीचा शेवटचा सामना ठरेल का? निसर्गाचा योगायोग असाच काहीसा घडत आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. पुढच्या आयपीएलला अजून 8-9 महिने आहेत, अशातच धोनी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT