Latest

Chahal’s Wife and Butler Video : बटलर आणि चहलच्या पत्नीचा ‘तो’ Video व्हायरल, फायनल हरल्यानंतर दोघांनी केला…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत राजस्थानचा संघ पराभूत झाला असला तरी संपूर्ण हंगामात संघाने चमकदार कामगिरी केली. संघाच्या अनेक खेळाडूंनी एकूण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. युजवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स मिळल्या आणि त्याने पर्पल कॅपवर नाव कोरले. तर सुरुवातीपासून सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर असणा-या जोस बटलर ऑरेंज कॅप आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरला. (Chahal's Wife and Butler Video)

दरम्यान, चहलची पत्नी धनश्री हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बटलर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बटलरसोबत धनश्री स्वतः त्याला डान्स स्टेप्स शिकवताना दिसत आहे, या दोघांबरोबर चहलही थिरकताना दिसतो आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. खरं तर, फायनल मॅचनंतर राजस्थानच्या खेळाडूंनी त्यांच्या मायदेशी परतण्यापूर्वी पार्टी केली, ज्याचा फोटोही धनश्रीने शेअर केला आहे. (Chahal's Wife and Butler Video)

याशिवाय धनश्रीने आणखी एक फोटो शेअर केला आहे जो चर्चेत आहे. खरं तर, धनश्रीने बटलरसह चहलचा प्रसिद्ध मीम पुन्हा तयार केला, ज्यामध्ये स्पिनर देखील उपस्थित होता.

हा फोटो शेअर करत धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चहल आणि बटलरसाठी माझ्याकडे असलेला आदर आणि प्रेम यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. जोस तू एक सज्जन आणि सर्वात अद्भुत व्यक्ती आहेस. आपण एकत्रपणे व्यतीत केलेले आनंदी क्षण आणि आपल्यातील काही गंभीर चर्चा नक्कीच आठवणीत राहतील.. हे सर्व मी मीस करेन… एकमेकांना अलविदा म्हणण्यापूर्वी आम्ही परस्परांना जे बोललो ते खरे आहे: आम्हाला ट्रॉफी मिळाली नाही पण आम्ही नक्कीच अनेकांची मने जिंकली, मी खूप नशिबवान आहे, मला यासर्वांबरोबर स्पर्धेची साक्षीदार बनायला मिळाले. आरआर हे माझे कुटुंब आहे. फायनलनंतरचे काही चांगले क्षण शेअर करत आहे.' (Chahal's Wife and Butler Video)

आयपीएलच्या या हंगामात बटलरने सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकण्यात तो यशस्वी ठरला. त्याने या हंगामात 864 धावा केल्या ज्यात 4 शतकांचा समावेश आहे. बटलरने राजस्थानसाठी जे केले ते चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ कधीही विसरू शकणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT