पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्रकार परिषद चालू असताना इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. सरकारने ही इंटरनेट सेवा तातडीने चालू करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी आज (दि. ३१) पत्रकार परिषदेत केली. या मागणीनंतर जालन्यातील अंशत: इंटरनेट सेवा करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्यांची प्रकृती खालवत आहे. तीव्र आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. आज (दि. ३१) जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद चालू असताना इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. जवळपास अर्धा तास ही इंटरनेट सेवा बंद होती. जरांगे पाटील यांनी ही इंटरनेट सेवा सुरु करावी अशी मागणी केल्यानंतर ही इंटरनेट सेवा अंशत: स्वरुपात करण्यात आली.
जालन्यामध्ये इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं नागरिकांनी सांगितले. इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर पुन्हा मराठा आंदोलक आक्रमक झाले. जरांगे पाटील पत्रकार परिषद सुरु असताना ही सेवा बंद झाल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे या जालन्यात काही काळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलक झाल्याचे दिसून आले. काही आंदोलकांनी जाळपोळ सुरु केला आहे. बीडमधील परिस्थिती पाहता प्रशासनाकडून बीडमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.