आंतरराष्ट्रीय

हाफिज सईद आहे तरी कोण? ज्याच्यावर 70 कोटींचं बक्षीस लावलंय…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय दहशतवादी असणारा हाफिज सईद याच्या घरासमोर नुकताच बाॅम्बस्फोट झाला. हा बाॅम्बस्फोट लाहोर शहरात झाला. त्यामुळे दोघांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झालेले आहेत. या बाॅम्बस्फोटामुळे मोस्ट वाॅन्टेड हाफिज सईल पुन्हा एकदा बातम्यांचा केंद्रबिंदू झालेला आहे. हाफिज सईद हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आहे. त्याच्यावर अमेरिकेने तब्बल ७० करोड रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. भारताला तो हवा आहे. पण, आजपर्यंत तो कुणालाही सापडलेला नाही. तरी हा मोस्ट वाॅन्टेड असणारा हाफिज सईद याच्या जीवनाबद्दल जाणून घेऊ…

हाफिज सईद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. तसेच तो पाकिस्तानमध्ये जमात-उद-दावा नावाचा संघटनादेखील चालवतो. ५ जून १९५० मध्ये हाफिजचा जन्म झाला होता. सध्या त्याचं वय सत्तरीच्या घरात आहे. त्याच्या बायकोचं नाव मैमूना सईद आहे, तर मुलाचं नाव तलहा सईग असं आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्याचं कुटुंब हरियाणामधून लाहोरला स्थलांतरीत झालं.

मूळचा इंजिनिअर असलेला हाफिज अरबी भाषेचाप्राध्यापक देखील होता. जमात-उद-दावा, अहले हदीद आणि लष्कर-ए-तोयबा, या दहशतवादी संघटनांनाचा संस्थापक आहे. यातील अहले हदीद नावाची संघटना भारतात मुस्लीम सत्ता आणण्याच्या ध्येयातून स्थापन करण्यात आली होती.

२००८ मध्ये मुंबईमध्ये जो बाॅम्बस्फोट झाला, त्याचा मास्टर माईंड हाफिज होता. या हल्ल्यात १६४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात ६ अमेरिकेचे नागरिकदेखील होते. २००६ मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जो साखली बाॅम्बस्फोट झाला, त्याच्यामागेही हाफिजचा हात होता. इतकंच नाही तर २००१ मध्ये भारताचं संसद उडविण्याचा प्रयत्नदेखील त्यानं केलेला होता. सध्या तो एनआयएच्या मोस्ट वाॅन्टेडच्या हीट लिस्टवर आहे.

मोस्ट वाॅन्टेड हाफिज सईद आहे तरी कोण?

मुंबईच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला हाफिजला आमच्याकडे सोपवा, असं सांगितलं. पण, पाकिस्तान त्याच्यावर असणारे आरोप फेटोळून लावतो आणि त्याला भारताकडे सुपूर्द करणं नाकारतो. भारतासहीत अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघ, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशांनी त्याच्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातलेली आहे. १९७९ मध्ये हाफिज अफगाणीस्तानात भरविण्यात आलेल्या अब्दुल रसूल सय्यफच्या शिबिरात सहभागी झाला होता. तेथे त्यांची भेट अलकायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य अब्दुला अज्जमशी झाली, त्यामध्ये ओसामा बिन लादेनदेखील होता.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात अमेरिकेचे ६ नागरिक मृत्यूमुखी पडलेले होते. त्यामुळे २०१२ मध्ये अमेरिकेने त्याच्यावर ७० करोड रुपयांचं बक्षीस जाहीर केलेले आहे. त्यावर हाफिजने हास्यास्पद प्रतिक्रिया दिली. २०१४ च्या एका मुलाखतीत हाफिजनं मुंबई हल्ल्याशी माझा काहीही संबंध नाही, असं सांगितलं आहे.

भारताच्या आग्रहामुळे इंटरपोलने हाफिज सईदच्या विरोधात २५ ऑगस्ट २००९ मध्ये रेड काॅर्नर नोटीस लागू केले. असं असतानाही हाफिज पाकिस्तानच्या रस्त्यांमध्ये बिनधास्त फिरताना दिसत होता. कारण, पाकिस्तानमध्ये त्याला फिरण्याचं स्वातंत्र्य होतं. २०१७ च्या प्रारंभी पाकिस्तान सरकारने जमात-उद-दावा संघटनेच्याविरोधात कारवाई सुरू केली. यामध्ये हाफिजला नजरबंदीमध्ये ठेवण्यात आले. पण, नोव्हेंबरमध्ये पुन्हा त्याला सोडून देण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानला जुलै २०१८ मध्ये एफएटीएफच्या ग्रे यादीत घालण्यात आले.

जुलै २०१९ मध्ये पुन्हा एकदा काऊंटर टेररिजम डिपार्टमेंटने हाफिजला अटक केली. त्यावेळी लाहोर ते गुजरांवाला दरम्यान प्रवास करत होता. लाहोर, गुजरांवाला, मुल्तान, फैसलाबाद आणि सरगोधा येथील पोलिस ठाण्यांमध्ये हाफिज सईद आणि अमीर अब्दुल रहमानमक्की याच्यासहीत अनेक दहशतवाही संघटनांच्या म्होरक्यांवर २३ तक्रारी दाखल करण्यात आल्या. या सर्वांवर आर्थिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यामध्ये हाफिजवर मनी लाॅंड्रिंग, दहशतवादी संघटनांना पैसा पुरवणे आणि बेकायदेशीर जमिनी बळकावणे, असे २९ केसेस दाखल करण्यात आले.

मोस्ट वाॅन्टेड हाफिज सईद आहे तरी कोण?

हाफिज सईदने कुठे आणि किती दहशतवादी हल्ले केले? 

२२ डिसेंबर २००० लाल किल्ल्यावर हल्ला : लष्कर-ए-तोयबाच्या ६ दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर रात्री हल्ला केला. त्यामध्ये दोन जवान मारले गेले आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी जामियानगरमधील चकमकीत मोहम्मद आरिफ आणि त्याच्या बायकोला अटक केली. आरिफला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. केस अजून न्यायालयात सुरू आहे.

१३ डिसेंबर २००१ संसद हल्ला : लष्कर-ए-तोयबाच्या दहशदवाद्यांनी संसदेवर हल्ला केला. दिल्ली पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दहशतवाद्यांवा यमसदनी धाडले. पण, दिल्ली पोलिस खात्यातील ८ पोलिसांचा मृत्यू झाला. हा हल्ला पाकिस्तानमध्ये बसलेले लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर झाला होता.

24 सप्टेंबर 2002 अक्षरधाम हल्ला : लष्कर-ए-तोयबा आणि जश्न-ए-मोहम्मदच्या दोन दहशदतवाद्यांनी गुजरातमध्ये असणाऱ्या अक्षरधाम मंदिरांवर हल्ला केला. एनएसजीच्या कमांडोंनी हा हल्ला मोडून काढत दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. मात्र, या हल्ल्यात जवळपास 30 लोकांचा मृत्यू झाला.

29 ऑक्टोबर 2005 दिल्ली साखळी बाॅम्बस्फोट ः देशाच्या राजधानी साखळी बाॅम्बस्फोट घडवून आणले आणि संपूर्ण देशाला हादरा दिला. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने तीन ठिकाणी हे बाॅम्बस्फोट घडवून आणले होते. पहाडगंड बाजार, सरोजिनीनगर मार्केट, गोविंदपुरी या तीन ठिकाणी हे स्फोट झाले. त्यात 62 लोकांचा मृत्यू झाला तर, 210 लोक जखमी झाले.

11 जुलै 2006 मुंबई लोकल ट्रेन स्फोट : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बाॅम्बस्फोट करण्यात आला. हा हल्ला 1993 नंतर सर्वात मोठा दहशहतवादी हल्ला मानला जातो. प्रेशर कुकरच्या माध्यमातून हा साखळी बाॅम्बस्फोट घडवून आणला होता. चौकशीनंतर लक्षात आले की, या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात होता, तर त्याला लष्कर-ए-तोयबाने प्रमुख मदत केली होती.

26/11 चा मुंबई हल्ला ः 26 नोव्हेंबर 2008 मध्ये लष्कर-ए-तोयबाचे 10 दहशतवादी समुद्री मार्गाने मुंबईत दाखल झाले. त्यांनी सलगपणे विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले केले. त्यामध्ये 164 लोकांचे प्राण गेले. 308 लोक जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यांमधील अजमल कसाब हा एक दहशतवादी होता. त्याला नंतर फाशी देण्यात आली.

27 जुलै 2015 गुरूदासपूर हल्ला : पाकिस्तानच्या 3 दहशतवाद्यांनी गुरूदासपूर जिल्ह्याच्या एका पोलिस ठाण्यावर हल्ला केली. एक पोलिस अधिकारी आणि तीन होमगार्ड शहीद झाले. पण, या कारवाईमध्ये तिन्ही आंतकवाद्यांना नर्काचे द्वार दाखविण्यात आले.

5 ऑगस्ट 2015 उधमपूर हल्ला : जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये 3 दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला केला. त्यामध्ये 2 जवान शहीद झाले. उलट कारवाईमध्ये 2 दहशतवादी मारले गेले. आणि एक पाकिस्तानी दहशवाद्याला अटक केली.

व्हिडीओ पहा : पालखी सोहळा हे महाराष्ट्राचं वैभव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT