आंतरराष्ट्रीय

सुझुकीची गुजरातेत 10,440 कोटींची गुंतवणूक

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सुझुकी मोटार कॉर्पोरेशन या जपानमधील अग्रगण्य उद्योगाने गुजरातमध्ये 10,440 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या प्रकल्पांतर्गत सुझुकी कंपनी गुजरातेत विद्युतशक्तीवर चालणारी (इलेक्ट्रिक) वाहने आणि बीईव्ही बॅटरीजचे उत्पादन करणार आहे.

यासंबंधीच्या सामंजस्य करारावर भारत-जपान आर्थिक सहकार्य मंचाच्या बैठकीत सह्या करण्यात आल्या. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा उपस्थित होते. आम्ही आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहोत, असा निर्वाळा यावेळी सुझुकी मोटार कॉर्पोरेशनच्या अध्यक्षांनी दिला आणि टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या घोषणेचे सर्व उपस्थितांनी स्वागत केले.

या कंपनीने गुजरातमध्ये 2019 मध्येच करार केला होता. भारत सरकार सध्या पर्यावरणपूरक वाहनांच्या निर्मितीवर विशेष जोर देत आहे. त्यामुळेच सुझुकीकडून भारतात केली जात असलेली ही अवाढव्य गुंतवणूक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. हा वाहनांमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुझुकीचा लिथियम आयन बॅटरीचा प्रकल्प गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात हंसलपूर परिसरात दोन टप्प्यांमध्ये उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्यात यापूर्वीदेखील सविस्तर चर्चा झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT