आंतरराष्ट्रीय

युनोत रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा प्रस्ताव पारित

backup backup

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला शुक्रवारी 1 वर्ष पूर्ण झाले. संयुक्त राष्ट्र महासभेत (युनो) गुरुवारी रात्री उशिरा युक्रेन-रशिया युद्ध संपुष्टात आणण्याच्या बाजूने एक प्रस्ताव दोनतृतीयांश मतांनी पारित झाला. रशियाने सैन्य माघारी घ्यावे, असे या प्रस्तावात म्हटलेले आहे. 141 देशांनी प्रस्तावाच्या बाजूने, तर बेलारूस, उत्तर कोरिया, सीरिया, माली, रशिया, इरीट्रिया व निकारागुआ या 7 देशांनी विरोधात मतदान केले. भारत, चीन व पाकसह 32 देशांनी मतदानच केले नाही.

चीनची शांतता योजना

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक 12 कलमी शांतता योजना जाहीर केली. रशिया व युक्रेनला शस्त्रसंधीचे आवाहन त्यातून करण्यात आले. पाश्चात्त्य देशांनी रशियावरील निर्बंध मागे घ्यावेत, युद्धात अण्वस्त्रांचा वापर करू नये, दोन्ही देशांनी नागरिकांवर हल्ले करू नयेत, असे यात चीनने म्हटले आहे.

युक्रेनला पाठिंबा; जगभर निदर्शने

गुरुवारी ब्रिटनची राजधानी लंडन, फ्रान्सची राजधानी पॅरिस व बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये रशियाविरोधात नागरिकांनी निदर्शने केली.

संयुक्त राष्ट्रांत पारित झालेला हा प्रस्ताव म्हणजे युक्रेनला मिळालेल्या जागतिक पाठिंब्याचा पुरावा आहे.
– वोल्दोमीर झेलेन्स्की,
राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

संयुक्त राष्ट्रांच्या या प्रस्तावाने युद्ध उलट अधिक भडकेल. अशा प्रस्तावांनी शांतता प्रस्थापित होत नसते.
– दिमित्री पोलान्स्की,
यूएनमधील रशियन राजदूत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT