Rishi Sunak
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्‍नी अक्षता यांच्‍यासह लंडनमधील स्‍वामी नारायण मंदिरात दर्शन घेतले.  Twitter
आंतरराष्ट्रीय

धर्म मला मार्गदर्शन करतो : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सूचक विधान

पुढारी वृत्तसेवा

'भगवद्गीते'वर संसद सदस्य म्हणून शपथ घेताना मला अभिमान वाटला. आमचा विश्वास आम्हाला कर्तव्य बजावायला शिकवतो. जोपर्यंत कोणतेही काम निष्ठेने करता तोपर्यंत परिणामाबद्दल घाबरू नका, याच विचाराने मला घडवले आहे, अशा शब्‍दांमध्‍ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ( Rishi Sunak) यांनी आपली भूमिका मांडली. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पत्‍नी अक्षता यांच्‍यासह लंडनमधील स्‍वामी नारायण मंदिरात दर्शन घेतल्‍यानंतर ते बोलत होते.

ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीची मोहीम अंतिम टप्प्यात येत असताना निजेल फॅरेजच्या उजव्या विचारसरणीच्या रिफॉर्म यूके पक्षाच्या समर्थकाने वर्णद्वेषी टिप्पणीवर सुनक यांनी वेदना आणि संताप व्‍यक्‍त केला. यानंतर दुसर्‍या दिवशी त्‍यांनी स्‍वामी नारायण मंदिरात पूजा केली.

आपला धर्म आपल्याला कर्तव्य बजावायला शिकवतो

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ऋषी सुनक ( Rishi Sunak) म्‍हणाले की, "मी हिंदू आहे. तुमच्या सर्वांप्रमाणेच मला माझ्या विश्वासातून प्रेरणा मिळते. भगवद्गीतेवर खासदार म्हणून शपथ घेताना मला अभिमान वाटला. आपला धर्म आपल्याला कर्तव्य बजावायला शिकवतो. कोणतेही कार्य करताना आपण प्रामाणिक असू तर परिणामांची काळजी करू नका. तुमचे कार्य प्रामाणिकपणे करा, माझ्या पालकांनी मला हे शिकवले आहे. मी तसाच मार्ग दाखवला. हाच धर्म मला सार्वजनिक सेवेचा मार्गही दाखविताे ."

ब्रिटीश-आशियाई पंतप्रधान असण्याचा मला अभिमान

कोणत्याही पतीला मिळू शकणारा सर्वात मोठा आधार आणि सेवा करण्‍यासाठीच्‍या जीवनासाठी वचनबद्ध, अशा शब्‍दांमध्‍ये त्‍यांनी पत्‍नी अक्षता यांचे कौतुक केले. मतदारांच्‍या पाठिंबा, प्रार्थना आणि प्रेमाबद्दल त्‍यांनी मतदारांचेही आभार मानले. तुम्ही माझ्या प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत आहात. या कामाच्या कठीण दिवसांमध्ये, मी तुमचा पाठींबा जाणवला. ब्रिटीश-आशियाई पंतप्रधान असण्याचा मला अभिमान आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

निगेल फॅरेजच्या रिफॉर्म यूके पक्षाच्या एका समर्थकाने सुनक त्याच्याबद्दल वांशिक अपशब्द काढले होते. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा जन्‍म १९८० मध्ये ब्रिटनमधील साउथॅम्प्टनमध्ये झाला. सुनक हे ब्रिटनचे पहिले वांशिक अल्पसंख्याक पंतप्रधान आहेत. पुढील आठवड्यात ब्रिटनमध्ये निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष केयर स्टाररच्या लेबर पार्टीपेक्षा २० गुणांनी पिछाडीवर आहे.

SCROLL FOR NEXT